शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Beetroot Side Effects: बीटरुटचे फायदे तेवढेच तोटे! रक्तदाब, मधुमेहासह हे आजार असतील अजिबात सेवन करू नका; नुकसानच नुकसान...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:17 PM

1 / 6
बीटरुट म्हणजेच बीटचे अनेक फायदे असतात. अनेक पोषक तत्वांनी युक्त बीटरूट केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. आतला भागच नाही तर त्याची साल त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्यांवर देखील प्रभावी आहे.
2 / 6
परंतू हाच बीटरुट आपल्याला हाणीकारक देखील आहे. बीट खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही आहेत. काही आजार असल्य़ास बीटरुटचे सेवन चुकूनही करू नये. कारण असे करणे नुकसानीचे ठरू शकते.
3 / 6
जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर बीट खाणे धोक्याचे आहे. कारण बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलते. नायट्रिक ऑक्साईड शरीरातील रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. यामुळे आधीच कमी रक्तदाब असेल तर धोका वाढू शकतो.
4 / 6
किडनी स्टोनमध्येही बीटरूटचे सेवन हानिकारक मानले जाते. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी बीटरूटचे सेवन करू नये. त्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.
5 / 6
तुम्ही जरी मधुमेहाचे रुग्ण असाल तरी बीटरूटपासून सावधच रहा. बीटरूट खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो. बीटरूटचा रस पिल्याने शरीरातील फायबर कमी होते आणि ग्लायसेमिक लोड वाढतो. यामुळे न सेवन केलेलेच बरे.
6 / 6
बीटरूट खाल्ल्यानंतर काहींना त्वचेवर पुरळ उठणे, पित्ताशयात खडे येणे, खाज येणे, थंडी वाजून येणे आणि ताप येणे यासारखा त्रास सुरु होतो. बीटरूट ज्यूस प्यायल्याने अनेकांना काही समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला बीटरूटची अशी कोणतीही ऍलर्जी वाटत असेल तर त्याचे सेवन करू नका.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह