शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?; ताप, खोकला अन्..., 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:04 PM

1 / 13
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी आता पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे.
2 / 13
आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा मोठा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक प्रगत देश देखील कोरोनापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
3 / 13
दक्षित कोरियात सर्वाधिक भीषण स्थिती असून तिथे दैनंदिन रुग्णसंख्या पाच लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यात सर्वाधिक कहर हा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए.2 चा असल्याचं समोर आलं आहे.
4 / 13
जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.2 विषाणूची लक्षणे सौम्य असल्याचं सांगितलं असली तरीही हा समज महागात पडू शकतो. कारण या व्हायरसच्या संसर्गदर मोठ्या प्रमाणात असल्याचं इतर देशांतील रुग्णसंख्येवरून दिसत आहे.
5 / 13
ज्या वेगाने कोरोना आता आपलं रूप बदलत आहे, त्याप्रमाणे या व्हायरसची लक्षणेही बदलत आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबतही वैद्यकीय तज्ञांकडून नवनवीन दावे केले जात आहेत.
6 / 13
पोटाशी संबंधित विविध लक्षणे दिसून येत असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार कॅलिफोर्नियाच्या 'सेंटर फॉर फंक्शनल मेडिसिन'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुंज्या श्वेग यांनी व्हायरसच्या लक्षणांबाबत भाष्य केलं आहे.
7 / 13
कोरोना विषाणूची लक्षणे ही प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असल्याचं याआधी अनेकदा दिसून आलं आहे. या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून आली आहेत.
8 / 13
ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटमध्ये सुरुवातीला घसा दुखण्यासह इतर लक्षणेही दिसू शकते, असं डॉ. श्वेग यांचं म्हणणं आहे. रुग्णांनी विविध समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
9 / 13
डॉ. सुंज्या श्वेग यांच्या म्हणण्यानुसार, बाधित रुग्णाला तापानंतर सर्दीसह खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो. त्यानंतर खोकल्यामुळे गळ्याला सूज येऊ शकते आणि डोकेदुखीही वाढण्याची शक्यता निर्माण होते.
10 / 13
स्नायूंमध्ये वेदना होणे हे कोरोनाचं सर्वसाधारण लक्षण आहे. या आजारात स्नायूच्या वेदना हळूहळू वाढून नंतर गंभीर रूप धारण करू शकतात.
11 / 13
स्नायूच्या वेदना या काही दिवस राहू शकतात. तर कधी कधी या जास्त वेळ देखील असू शकतात. विशेषत: लाँग कोविड असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होत असतो.
12 / 13
पॉझिटिव्ह व्यक्तीला उलटीचा त्रास सुरू होऊ शकतो. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार ओमायक्रॉनबाधित रुग्णांना उलटीचा त्रास सर्वाधिक जाणवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
13 / 13
श्वास घेण्यास त्रास होणे, लो ऑक्सिजन सॅच्युरेशन, सतत होणारी डोकेदुखी, ओठ आणि नखं पिवळी किंवा निळी होणं, उलटी असा त्रास जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन