Bells Palsy : Covid-19 patients are more prone to bells palsy side effects research
कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांमुळे वाढली चिंता, वाचा काय आहे हा गंभीर आजार By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:42 AM1 / 9एकीकडे कोरोनाची दुसरी लाट देशात कमी होताना दिसत आहे. तक दुसरीकडे वॅक्सीनेशनची प्रक्रिया जोरात सुरू आहे. कोविड वॅक्सीनमुळे आधीही ब्लड क्लॉटसारखे साइड इफेक्ट्स बघायला मिळाले आहेत. मात्र, आणखी धक्कादायक केस समोर आली आहे. कोविड वॅक्सीन घेतल्यानंतर लोकांना बेल पाल्सी म्हणजे फेशिअल पॅरालिसिसचे लक्षण आढळून आले आहे.2 / 9नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, बेल्स पाल्सीला कोविड-१९ वॅक्सीनच्या दुर्मिळ साइड इफेक्टच्या रूपात बघितलं जात आहे. हे साइड इफेक्ट त्या लोकांमध्ये अधिक कॉमन आहे जे कोरोनाने संक्रमित झाले होते. यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स क्लीवलॅंड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांना आढळलं की, ज्या लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी वॅक्सीन लावण्यात आली, त्यांच्या तुलनेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये फेशिअल पॅरालिलिसची शक्यता ७ पटीने अधिक होती. ३७ हजार वॅक्सीन घेणाऱ्यांपैकी केवळ ८ केस बेल्स पाल्सीच्या आढळून आल्या. तर वॅक्सीन घेणाऱ्या १ लाख लोकांमध्ये १९ केसेस होत्या. तर १ लाख कोविड रूग्णांमध्ये ही संख्या ८२ आढळून आली.3 / 9बेल्स पाल्सी एक अशी स्थिती आहे जी अचानक रूग्णाच्या चेहऱ्यावर दिसू लागते. यात रूग्णाच्या मांसपेशीमध्ये कमजोरी किंवा पॅरालिलिस होतो. यामुळे अर्धा चेहरा लटकतो. यामुळे व्यक्तीला बोलण्यात, डोळे बंद करण्यात समस्या येऊ शकते. सामान्यपणे ही एक अस्थायी स्थिती आहे. याच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांनंतर सुधारणा होते. तसेच या आजाराची लक्षणे सहा महिन्यात पूर्णपणे दूर होतात. फार कमी रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे जास्त काळासाठी दिसतात किंवा पुढे जाऊन याची लक्षणे दिसू शकतात.4 / 9ही स्थिती निर्माण होण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, हे शरीराच्या इम्यून सिस्टीमच्या अधिक प्रतिक्रियेमुळे होतं. याने चेहऱ्यावर सूज येते, ज्याने चेहऱ्या गती नियंत्रित करणाऱ्या तंत्रिकांना नुकसान होतं.5 / 9जॉन्सस हॉपकिन्सनुसार, बेल्स पाल्सी डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, जखम, लाइम डिजीज आणि काही संक्रमणामुळे होऊ शकतो. दरवर्षी फार कमी लोकांना हा आजार होतो.. यूएसमद्ये प्रत्येक १ लाख लोकांपैकी १५ ते ३० लोकांन हा आजार आढळून येतो.6 / 9मात्र, अलिकडे या आजाराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण कोविड वॅक्सीन घेणाऱ्या रूग्णांमध्ये बेल्स पॅरालिसिसच्या फार कमी केसेस आढळून आल्या. एका नव्या रिसर्चनुसार, बेल्स पॅरालिसिस, वॅक्सीन घेणाऱ्यांच्या तुलनेत कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांमध्ये होण्याचा धोका अधिक आहे. 7 / 9गुरूवारी जामा ओटोलरींगोलॉजी हेड अॅंन्ड नेक सर्जरीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, वैज्ञानिकांच्या टीमने जगभरातील ४१ आरोग्य संघटनांकडून मेडिकल रेकॉर्ड द्वारे बेल्स पाल्सीच्या धोक्याची तपासणी केली. या रेकॉर्ड्समध्ये डॉक्टरांनी जानेवारी आणि डिसेंबर २०२० दरम्यान कोविडने पीडित रूग्णांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्यात कोविड संक्रमणाच्या आठ आठवड्याच्या आत बेल्स पाल्सीची लक्षणे दिसली होती.8 / 9एकूण ३४ हजार रूग्णांपैकी डॉक्टरांनी कोविड रूग्णांमध्ये २८४ बेल्स पाल्सी केस नोंदवल्या. या रिसर्चनुसार, कोविड वॅक्सीन आणि बेल्स पाल्सी यात काहीच महत्वपूर्ण संबंध नाही. तरी सुद्धा वैज्ञानिकांनी तर्क दिला की, इतर वॅक्सीन ज्या एमआरएनएचा वापर करत नाही. त्यांच्या तुलनेत Pfizer आणि Moderna वॅक्सीनमध्ये बेल्स पाल्सीचा धोका अधिक राहू शकतो.9 / 9वैज्ञानिकांनुसार आतापर्यंत हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, कशाप्रकारे कोविड किंवा कोविड वॅक्सीन बेल्स पाल्सीचं कारण बनू शकतात. यासाठी आणखी रिसर्चची गरज आहे. मात्र, लोक या दुर्मिळ आजाराची चिंता न करता कोविडपासून वाचण्यासाठी वॅक्सीन घेऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications