benefits of beauty and health of honey
जाणून घ्या नियमित 1 चमचा मध खाण्याचे गुणकारी फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:50 PM1 / 71. शरीराला मिळते ऊर्जा : मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा.2 / 72. खोकल्यावर फायदेशीर : नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो. 3 / 73. हृदविकारांचा धोका कमी होतो : आरोग्य तज्ञ्जांनुसार मधाचे सेवन केल्यास रक्तामध्ये पॉलिफोनिक अँटी-ऑक्सिडेंट्सचा स्तर वाढवतो, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.4 / 74. चांगली झोप मिळते : मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. मधातील सेरोटोनिन रसायन शरीर मेलाटोनिन रसायनात बदलते, यामुळे झोप चांगली मिळते. अपुऱ्या झोपेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येईल. 5 / 75. रोगप्रतिकारकशक्ती वाढते : अॅन्टी-ऑक्सिडेंट आणि अॅन्टी बॅक्टिरिअल गुणांमुळे मधाचे सेवन शरीरास आरोग्यदायी आणि पोषक ठरते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबूचा रस एकत्र करुन प्यावे.6 / 76. रक्तदाब नियंत्रणात राहतो : नियमित एक चमचा मध किंवा गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. 7 / 77. वजन घटते : मधामुळे भूक नियंत्रणात राहते, यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहते. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास जास्तीत-जास्त कॅलरीज् बर्न होतात. याशिवाय, चहा-कॉफी किंवा वजन नियंत्रणात आणणाऱ्या पेयांमध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करावा. यामुळे वजन नियंत्रणात राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications