शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:16 PM

1 / 10
भारतात पूर्वापारपासून मसाल्यांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर केला जातो. मसाल्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मसाल्यांचा आहारात समावेश करणं फायद्यांचं ठरत असतं. रोजच्या जीवनात खाण्यापिण्याशी निगडीत अनेक चुका करत असल्यामुळे आजारांचा सामना करावा लागतो.
2 / 10
मसाल्यांचा आहारात समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. तसंच अनेक आजारांपासून सुद्धा लांब राहता येतं. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासह शरीराच्या इतर तक्रारींसाठी लवंग कशी फायदेशीर ठरते. याबाबत सांगणार आहोत.
3 / 10
वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या सतत जाणवत असतात. त्यासाठी लवंग तोंडात ठेवून चघळल्यास फरक दिसून येईल.
4 / 10
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर लवंग खाल्ल्याने पिंपल्स येणं बंद होईल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते. तसेच लवंगाच्या तेलात अँटी मायक्रोबियल असे गुणधर्म असतात. पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो.
5 / 10
तोंडातून दुर्गंर्धी येत असेल तर लवंगाचे सेवन केल्याने ही समस्या सुद्धा दूर होते.
6 / 10
लवंगाच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.
7 / 10
दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग गुणकारी ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी दूर होईल.
8 / 10
डोकेदुखीचा त्रास सुद्धा लवंगामुळे दूर होतो. डोकेदुखी लवंगाच्या तेलामध्ये मीठ मिसळून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
9 / 10
डोकेदुखीचा त्रास सुद्धा लवंगामुळे दूर होतो. डोकेदुखी लवंगाच्या तेलामध्ये मीठ मिसळून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
10 / 10
डोकेदुखीचा त्रास सुद्धा लवंगामुळे दूर होतो. डोकेदुखी लवंगाच्या तेलामध्ये मीठ मिसळून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स