शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोटाच्या विकारांसह रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतो पेरू; तज्ज्ञांनी सांगितले फायदे

By manali.bagul | Published: September 20, 2020 3:36 PM

1 / 8
पेरू हे अनेकांचं आवडतं फळ आहे. तिखट मीठ लावलेले पेरू खाण्याची मजा काही वेगळीच आहे. पेरू म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लाल, हिरवे पेरू पाहताचक्षणी लक्ष वेधून घेतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असतं.
2 / 8
अशा पोषक घटकांनी युक्त पेरू खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. माय उपचारशी बोलताना डॉक्टर लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी पेरू खाण्याच्या वेगवेगळे फायदे सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या सेवनानं शरीराला कोणते फायदे मिळतात.
3 / 8
पोटाच्या विकारांपासून आराम: चुकीचा आहार घेतल्यानं पोटासंबंधी समस्या वारंवार उद्भवतात. यावर उपाय म्हणून पिकलेल्या पेरूच्या फोड मीठ लावून खाव्यात. यामुळे पोटदुखी बरी होते. पेरूच्या बिया पोट साफ करण्यास मदत करतात.
4 / 8
पोट साफ होतं: अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो. त्यांनी नाश्त्यामध्ये दररोज पेरू खाल्ला पाहिजे. बद्धकोष्ठतेची समस्या जास्त असल्यास सकाळी आणि संध्याकाळी पेरू खाणं आवश्यक आहे.
5 / 8
गॅस एसिडीटी: गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवत असल्यास पेरूच्या बिया प्रभावी ठरतात. या बिया काढून त्यात गुलाबाचे पाणी आणि खडीसाखरेसह घेतल्यास एसिडीटी कमी होते. ज्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्याही दूर होते.
6 / 8
रक्ताची कमतरता भरून काढणं: पेरूमध्ये आयर्न आणि व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असतं. आयर्न हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करतं आणि जीवनसत्त्व सी शरीरात आयर्न शोषण्याचं कार्य करतं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत. अशक्तपणा असलेल्या व्यक्तीनं पेरूचं सेवन करायला हवं.
7 / 8
मूळव्याथावर फायदेशीर: मूळव्याध असल्यास पेरूची साल खूप फायदेशीर असते. १० ग्रॅम पेरूच्या सालीचं चूर्ण घेऊन त्याचा काढा तयार करून प्यायल्यानं या समस्येपासून आराम मिळतो. मूळव्याध असलेल्या रुग्णांनी कमीतकमी १ महिन्यांपर्यंत हा काढा सतत प्यावा.
8 / 8
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पेरूची पानं चघळ्यानं शरीरातील ताप कमी होतो. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पेरू खाणं टाळावं. पेरू थंड आहे मात्र त्यात तंतुमय घटक अधिक आहेत. ज्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि बाळाला दूध देणाऱ्या महिलेला सर्दीचा त्रास उद्भवू शकतो. .
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न