benefits of fasting
उपवास करण्याचे हे आहेत फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 3:03 PM1 / 5भोजनपद्धती सुधारते : बिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळीत झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.2 / 5वजन कमी होते : उपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.3 / 5इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते : उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटीव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. 4 / 5पचनशक्ती सुधारते : उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटॅबोलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फुड मेटॅबोलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटॅबोलिझमची कार्यक्षमता वाढते.5 / 5शारीरिक क्षमता वाढतात : वाचन, मेडिटेशन, योग, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications