benefits of laughter reduce risks of heart attack
दिलखुलास हसण्याचे हे आहेत फायदे, हार्टअटॅकचा धोकाही होतो कमी By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 3:43 PM1 / 6हृदयविकाराचा कमी धोका - हसण्यामुळे हृदयाचा व्यायाम होतो. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हसण्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते, असे काही संशोधनाद्वारे समोर आले आहे. 2 / 6तणाव कमी होतो - तणावामुळे बहुतेक लोक निराश आणि मानसिकरित्या खचलेले दिसतात. या समस्येविरोधात लढण्यासाठी हसणं हा एक उत्तम उपाय आहे. हसण्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.3 / 6काही जणांना घराबाहेर पडण्यास, किंवा कोणासोबतही बोलण्यास, माणसांच्या गर्दीत जाण्याची भीती वाटते. अशा व्यक्ती घरी एकटं राहणं पसंत करतात. या मानसिक आजाराविरोधात लढण्यासाठी हसणं हे एक चांगले औषध आहे. 4 / 6जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले शरीर एंड्राफिन नावाचे रसायन शरीराबाहेर फेकते. ही प्रक्रिया शरीरासाठी खूप चांगली मानली जाते. यामुळे आपल्या शरीराला शांतता मिळते, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे. 5 / 6जर रात्रीची झोप येत नसेल तर हसणं हा त्यावर एक चांगला उपाय आहे. 6 / 6असं म्हणतात हसण्यामुळे आपण नेहमी तरुण राहतो. हसण्यामुळे आपल्या चेहऱ्याचे 15 प्रकारचे स्नायू एकत्रितरित्या काम करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. आणखी वाचा Subscribe to Notifications