Benefits of chew curry leaves on empty stomach
कढीपत्त्याची कच्ची पाने खाल्ल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 9:58 AM1 / 9Curry Leaves Benefits : कढीपत्त्याच्या पानांचा आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. या पानांमुळे पदार्थांना एक वेगळीच टेस्ट आणि सुगंध येतो. मात्र, सोबतच आरोग्यालाही या पानांचा खूप फायदा मिळतो. आयुर्वेदात कढीपत्त्याला महत्वाची वनस्पती मानलं जातं. या पानांमध्ये शरीराला पोषण देणारे अनेक तत्व आहेत. अशात अनेक एक्सपर्ट सकाळी कढीपत्त्याची तीन ते चार कच्ची पाने चाऊन खाण्याचा सल्ला देतात. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की, याने काय होईल? तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2 / 9कढीपत्त्याच्या पानांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, विटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. चला जाणून घेऊ सकाळी जर ३ ते ४ पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो.3 / 9रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची काही पाने खाल्ल्याने पचन तंत्र चांगलं होतं. पोटासंबंधी समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.4 / 9कढीपत्त्याच्या पानांमध्ये डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे या पानांचं सेवन केल्याने रात आंधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळता येतो. तसेच डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.5 / 9पावसाळ्यात वेगवेगळ्या कारणांनी लोकांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशात या पानाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यात अॅंटीफंगल आणि अॅंटी-बायोटीक गुण असतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. 6 / 9कढीपत्त्याच्या पानांचं नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करण्यास मदत मिळते. त्यासोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतात.7 / 9तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ही पाने खाल्ली पाहिजे. या पानांच्या मदतीने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.8 / 9डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हाइपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.9 / 9कढीपत्त्याच्या पानांमध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिड असतं. जे एनीमियाच्या समस्येसोबत लढतात. या पानांमधील पोषक तत्वामुळे रक्तात हीमोग्लोबिन वाढतं आणि एनीमियाचा धोकाही कमी होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications