Benefits of drinking bay leaf water every morning on an empty stomach
रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या तमालपत्राचं पाणी, फायदे वाचून लगेच सुरू कराल हा उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:02 PM1 / 8Bay leaf water benefits : तमालपत्र म्हणजे तेजपत्ता हा भारतीय पदार्थांमध्ये वापरला जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासोबतच याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व भरपूर असतात. 2 / 8तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी तमालपत्राचं पाण्यासोबत सेवन केलं तर याने तुम्हाला बरेच फायदे होतील. याने पचन सुधारतं, डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते आणि हृदयही निरोगी राहतं. आज हेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.3 / 8तमालपत्राचं पाणी कसं कराल तयार? - एक ग्लास पाणी भांड्यात टाका आणि त्यात २ ते ३ तमालपत्र टाका. हे पाणी काही वेळ उकडू द्या. चांगलं उकडल्यानंतर हे पाणी गाळून एक एक घोट करत प्यावं.4 / 8किडनी निरोगी राहते - तमालपत्रामध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि ड्यूरेटिक तत्व किडनीला डिटॉक्स करण्यास मदत करतात. म्हणजे किडनी स्वच्छ करतात. ज्यामुळे किडनीचं आरोग्य सुधारतं आणि त्या अधिक पद्धतीने चांगलं काम करतात.5 / 8पचन तंत्र सुधारतं - याच्या सेवनाने पचन तंत्र अधिक चांगलं होतं. ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधी जसे की, गॅस, अॅसिडिटी, अपचन, पोटदुखी अशा समस्या होणार नाहीत. 6 / 8ब्लड शुगर कंट्रोल - तमालपत्रामध्ये असे काही पोषक तत्व असतात जे शरीरातील ग्लूकोजचं प्रमाण योग्य ठेवतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.7 / 8अॅंटी-ऑक्सिडेंट्स व अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व - तमालपत्रामध्ये असलेले अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच इतरही शारीरिक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.8 / 8तणाव कमी होतो - तमालपत्राच्या सेवनाने मानसिक तणाव कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचं मन शांत राहतं आणि तुम्हाला आराम मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications