Benefits of eating Garlic soaked in honey on an empty stomach
रोज सकाळी लसणाची एक कळी मधासोबत खा, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ! By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 3:49 PM1 / 9Honey and Garlic Health Benefits : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फारच गरजेचं झालं आहे. बरेच लोक आजकाल निरोगी जीवन जगण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचं सेवन करतात आणि एक्सरसाईज करतात. बरेच लोक हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसणाची कच्ची कळी खातात. याहून एक फायदेशीर उपाय म्हणजे लसणाची कळी आणि मध एकत्र खाणे. 2 / 9जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक कळी आणि मधाचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. लसूण आणि मध यांच्यात अॅंटी-बायोटिक, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे अनेक आजार दूर करण्यास मदत करतात. अशात लसूण आणि मधाचं सेवन कोणत्या लोकांनी आणि कशासाठी करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.3 / 9लसूण आणि मधात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्या इम्यूनिटी मजबूत होते आणि शरीराचा अनेक इन्फेक्शन व आजारांपासून बचाव होतो.4 / 9लसणांमध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. मधासोबत लसणाचं सेवन केल्याने हृदयाच्या धमण्यांमध्ये जमा प्लाक कमी होतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगल्या पद्धतीने होतं. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी राहतो.5 / 9लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन पचन तंत्रासाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने पोटातील सूज, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. याच्या सेवानाने आतड्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.6 / 9रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचं सेवन केल्याने मेटाबलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. याने शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट वेगाने बर्न होतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.7 / 9लसणाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. जेव्हा ते मधासोबत खाल्लं जातं तेव्हा ब्लड शुगर स्थिर राहते आणि डायबिटीसचा धोका कमी होतो.8 / 9लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने घशातील खवखव, खोकला आणि सर्दी दूर होण्यास मदत मिळते. यात अॅंटी-बायोटिक गुण असतात जे इन्फेक्शन कमी करण्याचं काम करतात आणि शरीराला लवकर बरं करतात.9 / 9एक ते दोन लसणाच्या कळ्यांचे तुकडे करा. हे तुकडे एक चमचा मधात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचं सेवन करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे काहीच खाऊ किंवा पिऊ नका. आणखी वाचा Subscribe to Notifications