दुपारच्या जेवणानंतर लगेच कामाला बसता? 'या' फायद्यांपासून रहाल तुम्ही वंचित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:54 IST
1 / 7Walking After Lunch: सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारचं जेवण पोटभर केलं जातं. रात्रीच्या तुलनेत दुपारचं जेवण जडही असतं. बरेच लोक दुपारचं जेवण केल्यावर लगेच एका जागी बसून काम करायला लागतात नाही तर घरी असणारे लोक लगेच झोपायला जातात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं खूप नुकसानकारक ठरू शकतं. एक्सपर्ट सांगतात की, दुपारचं जेवण केल्यावर तुम्ही कमीत कमी १ हजार पावलं चाललं पाहिजे. असं केल्यास काय फायदे होतात हे जाणून घेऊया.2 / 7वॉक करणं ही एक सगळ्यात सोपी आणि खूप प्रभावी एक्सरसाईज मानली जाते. भरपूर लोक सकाळी आणि सायंकाळी पायी चालतात. पण बरेच लोक दुपारच्या जेवणानंतर पायी चालत नाहीत. दुपारच्या जेवणानंतर पायी चालणं हे आपल्या शरीरासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. 3 / 7दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ पायी चालल्यास स्नायूंना ग्लूकोज अॅब्जॉर्ब करण्यास मदत मिळते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही. डायबिटीसचा धोका कमी केला जातो. तसेच दिवसभर एनर्जी लेव्हल कायम ठेवता येते.4 / 7लंचनंतर थोडं पायी चालणं पचनक्रियेसाठी आणि आतड्यांसाठी फायदेशीर असतं. पायी चालल्यास आतड्यांवरील सूज, अॅसिड रिफ्लक्स आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. सोबतच पचन चांगलं होतं.5 / 7दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ पायी चालल्यास एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात, जे टेंशन कमी करतात. मूड चांगला करतात आणि फोकस करण्यास मदत करतात. ज्यामुळे दिवसभर मानसिक आरोग्य चांगलं राहतं.6 / 7दुपारी जेवण झाल्यावर नियमितपणे चालण्याची सवय लावाल तर ब्लड फ्लो वाढतो, बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं, ब्लड प्रेशर कंट्रोल होतं आणि हृदय निरोगी राहतं. जेवल्यावर पायी चालल्यास वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो.7 / 7दुपारच्या जेवणानंतर हलकी एक्सरसाईज केली तर सर्केडिअन रिदम कंट्रोल करण्यास, अस्वस्थता कमी करण्यास आणि मेलाटोनिन उत्पादन वाढवण्यास मदत मिळते. ज्यामुळे झोपेची क्वालिटी सुधारते.