शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर 'या' ४ झाडांची पानं ठरतील रामबाण उपाय! झटपट होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 5:02 PM

1 / 6
4 types of leaves to reduce bad cholesterol risk of heart attack: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं ही एक गंभीर समस्या मानली जाते. या समस्येला काही लोक सायलेंट किलरही म्हणतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असलं तरी सुरूवातीला त्याची लक्षणे पटकन समजून येत नाहीत.
2 / 6
कोलेस्ट्रॉलचं शरीरातील प्रमाण अधिक वाढलं तर रक्तवाहिन्यांच्या नसा ब्लॉक होण्याचा धोका असतो. इतकेच नव्हे तर यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अटोक्यात आणण्यासाठी चार प्रकारच्या झाडांची पाने फायदेशीर ठरू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
3 / 6
त्यांच्या अँटिऑक्सिडंट, दाह कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखली जातात. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासाठी कडुनिंबाच्या पानांची साल सुकवून त्याची पावडर बनवावी. नंतर ही पावडर पाण्यात टाकून उकळावी. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यावे.
4 / 6
हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास एक शक्तिशाली आयुर्वेदिक उपाय आहे. तुळशीमध्ये विशेषतः 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' कमी करण्याचे गुणधर्म आहेत. यासाठी तुळशीची पाने धुवून वाळवा आणि चहाच्या पत्तीसारखी वापरा. पाणी उकळून त्यात तुळशीची पाने टाका आणि ते चहासारखे उकळून त्याच्या काढ्याचे सेवन करा.
5 / 6
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे. त्यात अँथोसायनिन्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यासाठी ताज्या जांभळाची पाने सुकवून पावडर बनवा. नंतर ही पावडर पाण्यात टाकून उकळा. हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा प्यावे.
6 / 6
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामध्ये फायबर असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. यासाठी ताज्या मेथीच्या पानांची कोशिंबीर बनवून खा. याशिवाय ताजी मेथीची पाने नीट धुवून पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवा. मग हे पाणी तुम्ही दिवसा पिऊ शकता.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स