Best effective ways to clear mucus in chest and throat
छातीत जमा झालेला कफ झटक्यात बाहेर काढण्याचे सोपे घरगुती उपाय, लगेच ट्राय करा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 12:04 PM1 / 10हिवाळ्यात इम्यूनिटी सिस्टीम कमजोर झाल्याने इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढतो. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त लोक या दिवसात सर्दी, खोकला आणि घशात खवखव या समस्यांनी पीडित असतात. सगळ्यात जास्त त्रास देतो घशात आणि छातीत जमा कफ. छातीत कफ जमा झाल्याने भयंकर खोकला येतो आणि सोबतच घसाही दुखू लागतो.2 / 10आल्याच्या मदतीने काढा कफ - आल्याचा वापर तुम्ही कफची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. यात अॅंटी-इंफ्लामेटरी प्रॉपर्टी असते. याने मळमळ आणि वेदनेचीही समस्या होऊ शकते. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, आल्यामधील अॅंटी-इंफ्लामेटरी तत्वमुळे एअरवेज मेंबरेनमध्ये आराम मिळतो. ज्यामुळे कफची समस्या कमी होते. कफची समस्या असेल तर आल्याचा चहा सुद्धा फायदेशीर ठरतो. एक कप गरम पाण्यात २० ते ४० ग्रॅम आलं बारीक करून टाकून चहा तयार करा. सोबतच लिंबाचा रस आणि मधही मिश्रित करू शकता. 3 / 10इतर पेय-पदार्थ - जर तुम्हाला कफ आणि खोकल्याची समस्या असेल तर तरल पदार्थांचं सेवन करताना काळजी घ्यावी. रिसर्चमधून समोर आले आहे की, रूम टेम्प्रेचरमध्ये तरल पदार्थ सेवन केल्याने कफ आणि खोकल्याची समस्या कमी होऊ शकते. ज्या लोकांना फ्लूची समस्या असेल त्यांनी तरल पदार्थ हलके गरम करून खावेत. सोबतच पेयांमध्ये हर्बल चहा, ब्लॅक टी, गरम पाणी आणि गरम फ्रूट ज्यूसचा समावेश करावा.4 / 10कफ काढण्याचा उपाय स्टीम - कोरडा कफ असेल तर अधिक प्रमाणा म्युकस तयार होतो. अशात कफपासून सुटका मिळवायची असेल तर स्टीम घेणं चांगलं ठरू शकतं. स्टीम घेतल्यानंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी प्यावे. एका भांड्यातील पाण्यात हर्ब किंवा एसेंशिअल ऑइल जसे की, नीलगिरी किंवा रोजमेरी ऑइलचे काही थेंब टाकावे. स्टीम घेताना काही सेकंदाचा ब्रेकही घ्यावा नाही तर स्कीन बर्नची समस्या होऊ शकते.5 / 10मधाचा वापर - कफ काढण्यासाठी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता. एका रिसर्चनुसार, औषधांपेक्षा मध अधिक प्रभावी ठरतं. यासाठी दोन चमचे मध हर्बल टी किंवा गरम पाण्यातून घ्या. मधात अॅंटी-बायोटिक गुण असतात. याने घशाला आराम मिळतो. सोबतच लिंबाचा रस घशाची खवखव कमी करण्यास मदत करतो.6 / 10पेपरमिंटचा वापर - कफ दूर करण्यासाठी तुम्ही पेपरमिंटचा देखील वापर करू शकता. पेपरमिंटची पाने म्हणजे पुदीन्याची पाने आपल्या हीलिंग तत्वांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील मेंथॉल घशाची खवखव कमी करतं आणि याने कफ निघण्यास मदत होते. याने म्युकस ब्रेकडाउन करण्याचं काम होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरमिंटचा वापर तुम्ही चहासाठीही करू शकता किंवा वेपर स्टीम बाथच्या रूपातही करू शकता. 7 / 10हळदीचा वापर - हळदीमध्ये कर्क्यूमिन तत्व असतं. तसेच यात अॅंटी-इंफ्लोमेटरी तत्वही असता. कोरडा खोकला दूर करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही हळदीचं महत्व सांगितलं आहे. हळदीसोबत काळे मिरे सेवन केले तर कफची समस्या दूर होते. चहातही याचा वापर करू शकता.8 / 10ओव्याचा वापर - कफ काढण्यासाठी ओव्याच्या पानांचा वापरही फायदेशीर ठरतो. यात थाइम हे तत्व असतं. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, ओव्याच्या पानांचा रस सेवन केल्यास कफ दूर होतो आणि घशाला आराम मिळतो. ओव्याच्या पानांमध्ये फ्लेवोनोइड्स नावाचं तत्व असतं ज्याने घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो. तसेच खोकलून खोकलून आलेली सूजही कमी होते. 9 / 10मीठ आणि पाणी - कफाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा आणि मिठाचा वापर करू शकता. हा सर्वात सोपा उपाय आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुरळा करावा. पण हा उपाय वयस्कांनी करावा. सहा वर्षांपेक्षा लहान मुलांना या पाण्याने गुरळा करू देऊ नका.10 / 10या गोष्टींचीही घ्या काळजी - खोकला किंवा कफची समस्या काही लोकांना एका विशिष्ट्य वातावरणातच होते. अशात त्या त्या वेळी योग्य ती काळजी घेतली गेली तर ही समस्या होणार नाही. जास्तीत जास्त लोकांना ऑक्टोबरमध्ये कफची समस्या होते. त्यामुळे त्यादरम्यान विशेष काळजी घ्यावी. आणखी वाचा Subscribe to Notifications