शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी वयातच पांढरे केसांमुळे हैराण झालात? केस काळे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:58 PM

1 / 9
कमी वयातच पांढरे केस होण्याची समस्या अलिकडे सामान्य बाब झाली आहे. पण यामुळे अनेकांना चारचौघात अवघडल्यासारखे होते. हे केस लपवताही येत नाहीत. अशावेळी महागड्या उत्पादनांचा वापर केला जातो. पण त्यानेही फार फरक पडलेला दिसत नाही. अशात अनेकांना निराशा येते. पण आम्ही तुमची ही निराशा दूर करण्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाहीये. कारण आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत.
2 / 9
आवळ्याची कमाल - चविला आबंट-तुरट असलेला आवळा तुमच्या आरोग्यासाठी चांगलाच फायदेशीर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याचा नियमीत सेवन केल्याने तुमची पांढऱ्या केसांची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी आवळा केवळ खाऊ नका तर हा मेहंदीमध्ये मिश्रित करुन केसांना लावा. तसेच आवळा बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करा. हे तेल रोज केसांना लावा, यानेही समस्या दूर होईल.
3 / 9
काळे मिरे - काळे मिरे हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चवीचं काम तर करतच सोबतच याने पांढरे केस काळेही होतात. यासाठी काळे मिरे पाण्यात उकडून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा. काही वेळा हा उपाय केल्यास पांढरे केस काळे होतील.
4 / 9
कॉफी आणि काळा चहा - जर तुम्हाला पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या भेडसावत असेल तर काळा चहा आणि कॉफीची मदत घेऊ शकता. पांढरे झालेले केस जर तुम्ही काळ्या चहाच्या किंवा कॉफीच्या अर्काने धुवाल तर पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील. हा उपाय किमान दोन ते तीन वेळा करावा.
5 / 9
कोरफडीचा उपयोग - केसांना कोरफडीचा गर लावल्यानेही केस गळणे आणि पांढरे होणे बंद होतात. यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा.
6 / 9
दह्याने करा केस काळे - पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही दह्याचाही वापर करु शकता. यासाठी हिना आणि दही समान प्रमाणात मिश्रित करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. हा घरगुती आठवड्यातून एकदा केल्यास केस काळे होऊ शकतात.
7 / 9
कांद्याचा वापर - कांदाही तुमचे केस काळे करण्यासाठी मदत करतो. काही दिवस आंघोळ करण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट लावा. याने पांढरे केस काळे होऊ लागतील. तसेच केसांना चमकही येईल.
8 / 9
भृंगराज आणि अश्वगंधा - भृंगराज आणि अश्वगंधाची मूळं केसांसाठी वरदान मानले जातात. याची पेस्ट तयार करुन त्यात खोबऱ्याचं तेल टाका. ही पेस्ट काही तासांसाठी केसांच्या मुळात लावा. नंतर केस कोमट पाण्याने चांगले स्वच्छ करुन घ्यावे. यानेही केस काळे होतात.
9 / 9
कढीपत्ता - पांढरे होत असलेल्या केसांसाठी कडीपत्ता फार चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात कढीपत्त्याची काही पाने टाका आणि एक तासांनी त्या पाण्याने केस धुवावे. किंवा कढीपत्त्याची पाने बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात टाका. हे तेल केसांना लावा. यानेही फायदा होतो.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यBeauty Tipsब्यूटी टिप्स