शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

औषधांसाठी खर्च न करता घरगुती उपायांनी असा बाहेर काढा छातीत जमा झालेला कफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 10:00 AM

1 / 9
हिवाळा आणि पावसाळा आला की, अनेकांना कफ होण्याची समस्या होते. छातीत जमा झालेला कफ फारच त्रास देतो आणि खोकून खोकून लोक वैतागून जातात. ही समस्या वेळीच सोडवली नाही तर गंभीरही होऊ शकते. जास्त कफ झाला तर तो काढण्यासाठी काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात.
2 / 9
हळद - हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही हळदीचं महत्व सांगितलं आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन तत्व असतं. तसेच यात अॅंटी इंफ्लोमेटरी तत्वही असतं. कोरडा खोकला दूर करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. हळदीसोबत काळे मिरे सेवन केले तर कफची समस्या दूर होते. चहातही याचा वापर करू शकता.
3 / 9
ओवा - कफ काढण्यासाठी ओव्याच्या पानांचं सेवन करू शकता. यात थाइम नावाचं तत्व असतं. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, ओव्याच्या पानांचा रस सेवन केल्यास कफ दूर होतो आणि घशाला आराम मिळतो. तसेच ओव्याच्या पानांमध्ये फ्लेवोनोइड्स नावाचं तत्व असतं ज्याने घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो. तसेच खोकलून खोकलून आलेली सूजही कमी होते.
4 / 9
मीठ आणि पाणी - छातीमध्ये जमा झालेला कफ काढण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा आणि मिठाचा वापर करू शकता. कोमट पाण्यात मीठ टाकून गुरळा करावा. पण हा उपाय वयस्कांनी करावा. सहा वर्षांपेक्षा लहान मुलांना या पाण्याने गुरळा करू देऊ नका.
5 / 9
आल्याच्या चहा - शरीरातील कफ बाहेर काढण्यासाठी आले फार उपयोगी आहे. रिसर्चमधून समोर आलंय की, आल्यामधील अॅंटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे एअरवेज मेंबरेनमध्ये आराम मिळतो. ज्यामुळे कफची समस्या कमी होते. एक कप गरम पाण्यात २० ते ४० ग्रॅम आलं बारीक करून टाकून चहा तयार करा. सोबतच लिंबाचा रस आणि मधही मिश्रित करू शकता.
6 / 9
मध - कफ काढण्यासाठी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता. एका रिसर्चनुसार, औषधांपेक्षा मध अधिक प्रभावी ठरतं. यासाठी दोन चमचे मध हर्बल टी किंवा गरम पाण्यातून घ्या. मधात अॅंटी-बायोटिक गुण असतात. याने घशाला आराम मिळतो. सोबतच लिंबाचा रस घशाची खवखव कमी करण्यास मदत करतो.
7 / 9
पुदीना - कफ दूर करण्यासाठी तुम्ही पेपरमिंट म्हणजे पुदीन्याचा देखील वापर करू शकता. पेपरमिंटची पाने म्हणजे पुदीन्याची पाने आपल्या हीलिंग तत्वांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील मेंथॉल घशाची खवखव कमी करतं आणि याने कफ निघण्यास मदत होते. याने म्युकस ब्रेकडाउन करण्याचं काम होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरमिंटचा वापर तुम्ही चहासाठीही करू शकता किंवा वेपर स्टीम बाथच्या रूपातही करू शकता.
8 / 9
स्टीम - कोरडा कफ असेल तर अधिक प्रमाणात म्युकस तयार होतो. अशात कफपासून सुटका मिळवायची असेल तर स्टीम घेणं चांगलं ठरू शकतं. स्टीम घेतल्यानंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी प्यावे. एका भांड्यातील पाण्यात हर्ब किंवा एसेंशिअल ऑइल जसे की, नीलगिरी किंवा रोजमेरी ऑइलचे काही थेंब टाकावे. स्टीम घेताना काही सेकंदाचा ब्रेकही घ्यावा नाही तर स्कीन बर्नची समस्या होऊ शकते.
9 / 9
या गोष्टींचीही घ्या काळजी - खोकला किंवा कफची समस्या काही लोकांना एका विशिष्ट्य वातावरणातच होते. अशात त्या त्या वेळी योग्य ती काळजी घेतली गेली तर ही समस्या होणार नाही. जास्तीत जास्त लोकांना ऑक्टोबरमध्ये कफची समस्या होते. त्यामुळे त्यादरम्यान विशेष काळजी घ्यावी.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य