शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirusVaxin : स्वदेशी लशीमध्ये टाकली जाणार 'ही' खास गोष्ट, दीर्घकाळ तुमच्या जवळही फिरकणार नाही कोरोना!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 05, 2020 2:58 PM

1 / 16
भारत बायोटेकने अपल्या कोरोना लशीमध्ये आणखी एक औषध टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या Covaxinमध्ये Alhydroxiquim-II नावाचे अजुवंट टाकणार आहे. यामुळे लशीतील इम्‍युन रिस्‍पॉन्स अधिक चांगला होईल. परिणामी या लशीमुळे दीर्घकाळ कोरोनापासून मनुष्याचा बचाव होईल.
2 / 16
अजुवंट एक असे एजंट असते, जे लशीसोबत एत्र केल्यास लशीची क्षमता वाढते. हे असलेली लस टोचल्यास शरिरात अधिक अँटिबॉडीज तयार होतात. तसेच दीर्घकाळ इम्यूनिटी मिळते.
3 / 16
ViroVaxने भारत बायोटेकला Alhydroxiquim-II अजुवंटचे लायसन्स दिले आहे. ही लस सध्या परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.
4 / 16
...म्हणून खास आहे Alhydroxiquim-II अजुवंट - भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्‍टर कृष्‍णा एल्‍ला यांनी सांगितल्यानुसार, अॅल्‍युमिनियम हायड्रॉक्‍साईडचा अजुवंट म्हणून अनेक कोरोना लशीं तयार करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.
5 / 16
कृष्‍णा एल्‍ला म्हणाले, अॅल्‍युमिनियम हायड्रॉक्‍साईड Th2वर आधारलेला रिस्‍पॉन्स (एक्‍स्‍ट्रासेलुलर पॅरासाइट्स आणि बॅक्‍टेरिअल इन्‍फेक्‍शन संपवण्यासाही आवश्यक आहे.) निर्माण करते. Th2वर आधारलेल्या रिस्‍पॉन्समुळे लशीशी संबंधित श्‍वसन समस्‍येची (VAERD या ADE) समस्या निर्माण होऊ शकते.
6 / 16
कृष्णा एल्‍ला यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या कंपनीने अजुवंट्सच्या Imidazoquinoline क्‍लासचा वापर केला आहे. यामुळे Th1वर आधारीत रिस्पॉन्स तयार होतो. यामुळे ADEचा धोका कमी होतो.
7 / 16
Covaxin शिवाय आणखी दोन लशींचे भारतात परीक्षण सुरू आहे. ICMR-NIV आणि भारत बायोटेकने या दोघांनी मिळून COVAXIN तयार केली आहे. याचे पहिल्या टप्प्यावरील मानवी परीक्षण पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे. ही लस प्राण्यांवरील परीक्षणात त्यांच्यातील इम्‍युन रिस्‍पॉन्स वाढवण्यात यशस्वी ठरली आहे.
8 / 16
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ने ऑक्‍सफर्डच्या अॅस्ट्रॉजेनेकाच्या लशीसोबत भागीदारी केली आहे. कंपनी देशात या 'कोविशील्‍ड' नावाच्या लशीचे परीक्षण करत आहे.
9 / 16
भारत बायोटकने Covaxin नावाने लस तयार केली आहे. तर जायडस कॅडिलाने ZyCov-D नावाने लस तयार केली आहे.
10 / 16
जुलै 2021पर्यंत 40 ते 50 कोटी डोस मिळवण्याची आशा असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे 20 ते 25 कोटी लोकांना लस टोचता येईल.
11 / 16
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीती आयोगाचे डॉ व्हीके पॉल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्तरीय समिती यासंदर्भात संपूर्ण प्लॅन करत आहे. व्हॅक्सीन मिळाल्यानंतर केंद्र सरकार राज्यांनाही डोस पाठवणार आहे. त्यांना स्‍टोरेज आणि लसिकरणाची व्यवस्था करावी लागेल.
12 / 16
एवढेच नाही, तर ज्यांना सर्वप्रथम लस टोचायची आहे, त्यांची यादीही मागवण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
13 / 16
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात डेव्हलप होत असलेली लस, सर्वप्रकारच्या सुरक्षिततेच्या स्तरावर यशस्वी ठरल्यानंतरच भारतात येईल.
14 / 16
हर्षवर्धन यांनी सांगितले, की परदेशी लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे निश्चित केल्यानंतरच ती लोकांना दिली जाईल.
15 / 16
रशियाच्या Sputnik V लशीसंदर्भात सरकारने अद्याप कासल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. सरकार शिवाय अनेक खाजगी कंपन्यांनी परदेशातील लस निर्माता कंपन्यांशी करार केला आहे.
16 / 16
SIIने अॅस्ट्राजेनेकाशिवाय अमेरिकन कंपनी Novavax सोबतही लशीसाठी टाई-अप केले आहे. Dr Reddy’s Laboratories रशियाची Sputnik V लस भारतात आणण्याच्या तयारीत आहे. बायोलॉजिकल ईने Johnson & Johnson सोबत त्यांच्या लशीची डील केली आहे.