पेपर कपमधून चहा पिता?, वेळीच व्हा सावध अन्यथा...; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 10:28 AM
1 / 10 सकाळच्या वाफळलेल्या चहाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत कामाची सुरुवात करत असतो. काहींचं तर कामाच्या ठिकाणी दिवसातून बऱ्याचदा चहा पिणं होतं. 2 / 10 चहाच्या टपरीवर काचेच्या ग्लासमधून तर आधी प्लास्टिकच्या ग्लासमधून चहा दिला जायचा. मात्र प्लास्टिकच्या ग्लासमधून चहा पिणं हे आरोग्यासाठी घातक असल्याने तसेच ते पर्यावरणासाठी देखील धोकादायक असल्याने हळूहळू त्याचा वापर हा बंद झाला आहे. 3 / 10 हल्ली बऱ्याच ठिकाणी पर्यावरण पूरक अशा पेपर कपमधून (Disposable Paper Cups) चहा दिला जातो. मात्र तुम्ही जर पेपर कपमधून चहा पित असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण याबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. 4 / 10 कागदापासून तयार केलेल्या डिस्पोजेबल कपमधून चहा पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हो मोठा खुलासा करण्यात आला आहे. 5 / 10 आयआयटी खड़गपूर (IIT Kharagpur) च्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमधून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन वेळा पेपर कपमधून चहा पीत असेल, तर त्याच्या शरीरात प्लास्टिकचे (Micro-plastic) 75,000 सूक्ष्म कण जातात असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 6 / 10 चहा अथवा एखादं पेय देण्यासाठी हमखास पेपर कपचा वापर केला जातो. हल्ली तो एक उत्तम पर्याय देखील आहे. मात्र पेपर कप तयार करताना वापरण्यात येणारे घटक हे हानिकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे. 7 / 10 रिसर्च करणाऱ्या आयआयटी खरगपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. सुधा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्पोजेबल पेपर कपमध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होत असल्याचं संशोधनात स्पष्ट झालं आहे. 8 / 10 पेपर कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर त्यात बसविला जातो. हा थर प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्या मदतीने, कपमधील द्रव टिकून राहते. मात्र गरम पाणी घालल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते. 9 / 10 रिसर्चनुसार, 'एका कपात फक्त 15 मिनिटांसाठी 100 मिली गरम द्रव पदार्थ (85-90 ओसी) ठेवल्यास त्यात 25,000 मायक्रॉन आकाराचे (10 मायक्रोन ते 1000 मायक्रोन) प्लास्टिकचे सूक्ष्म कण विरघळतात' 10 / 10 'पेपर कपमधून दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75000 सूक्ष्म कण जातात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा