biontech says no evidence of covid 19 vaccine will work if boster dose delayed
Coronavirus Vaccine: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास कोणताही परिणाम होणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 9:02 AM1 / 8नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचे काम आत जगभरात सुरू झाले आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या काही देशांमध्ये लसीकरणाची सुरूवात झाली आहे.2 / 8यातच, फार्मा कंपनी बायोएनटेक आणि फायझरने आपल्या कोरोना लसीबाबत मोठा दावा केला आहे. दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीच्या पहिल्या आणि बूस्टर डोसमध्ये उशीर झाल्यास कोरोना लसीचा प्रभावी ठरल्याचा कोणताही पुरावा नाही.3 / 8जर्मनी आणि डेन्मार्क सारखे देश इतर डोससाठी ठरलेल्या वेळत उशीर करण्याविषयी बोलत असताना या दोन्ही कंपन्यांचे हे संयुक्त विधान समोर आले आहे. 4 / 8तसेच, फायझर आणि बायोएनटेक या औषधी कंपन्यांचे म्हणणे आहे की, चाचणी प्रमाणे कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसच्या दरम्यान तीन आठवड्यांचे अंतर असावे.5 / 8कोरोना लसीचा सहज पुरवठा करण्यासाठी जर्मनीने सोमवारी दुसऱ्या डोसला उशीर करण्याचा विचार केला. गेल्या आठवड्यात ब्रिटननेही असेच पाऊल उचलले आहे. तर डेन्मार्कने कोरोना लसच्या पहिल्या आणि दुसर्या डोस दरम्यान 6 आठवड्यांच्या कालवधीला मान्यता दिली आहे.6 / 8दुसरीकडे, फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी विकसित केलेल्या कोविड -१९ च्या डोसमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असल्यानंतर, शास्त्रज्ञांनी पहिल्या डोसनंतर प्रतिकूल लक्षणे दर्शविणाऱ्यांना दुसरा डोस देण्यापूर्वी काही सुरक्षा उपायांची रूपरेषा सांगितली आहे. 7 / 8'अॅलर्जी अँड क्लिनिकल इम्युनोलॉजी: इन प्रॅक्टिस' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात कोविड -१९ च्या लसीकरणानंतर उद्भवणार्या अॅलर्जीची ज्ञात तथ्ये उघडकीस आली आहेत.8 / 8या संशोधनात शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व मेसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील अॅलर्जी शास्त्रज्ञांनी केले. यामध्ये सविस्तर सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरुन विविध प्रकारच्या अॅलर्जीमुळे ग्रस्त असणारे लोक सुरक्षितपणे कोविड -१९ ची लस घेऊ शकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications