Black Salt Water : Black Salt Water drinking benefits you should know
Black Salt Water: काळ्या मिठाच्या पाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, जाणून घ्या फायदे.... By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 11:22 AM1 / 6Why We Should Drink Black Salt Water: आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की, पांढऱ्या मिठाऐवजी काळं मीठ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतं. काळ्या मिठाचा वापर लोणचं, ड्रिंक्स आणि फ्रूट सलाद तयार करण्यासाठी जास्त केला जातो. कारण याने टेस्ट वाढते. प्रसिद्ध डायटिशिअन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं की, काळ्या मिठाचं पाणी प्यायल्याने आरोग्याला किती आणि कसे फायदे होतात.2 / 6काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे फायदेशीर न्यूट्रिएंट्स आढळतात. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. जर तुम्ही काळ्या मिठाच्या पाण्याचं रोज सेवन कराल तर याने शरीराला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ काय काय फायदे होतात.3 / 61) डायबिटीसमध्ये मिळेल आराम - डायबिटीसच्या रूग्णांना साखर आणि मिठाचं सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण पांढऱ्या मिठांमध्ये सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका जास्त असतो. अशात बरं होईल की, डायबिटीसच्या रूग्णांनी काळ्या मिठाचं सेवन करावं. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.4 / 62) पचनक्रियेत फायदेशीर - जर रोज सकाळी काळ्या मिठाच्या पाण्याचं सेवन केलं तर डायजेशन चांगलं राहतं. कारण याने हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रोटीनला पचवणारे एंजाइम अॅक्टिव होतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर होतात.5 / 63) केसांसाठी फायदेशीर - काळ्या मिठामध्ये एक्सफोलिएटिंग आणि क्लीजिंग प्रॉपर्टीज आढळतात. ज्या केसांसाठी जास्त फायदेशीर असतात. याने केसांचं आरोग्य चांगलं राहतं. याने स्कॅप्ल आणि केस साफ होतात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस मजबूत होतात.6 / 64) वजन कमी होतं - भारतात वजन वाढण्याच्या समस्येने अनेक लोक हैराण आहेत. कारण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. काळ्या मिठाच्या पाण्यात अॅंटी-ओबेसिटी तत्व आढळतात. ज्याने वाढलेलं वजन कमी होण्यास मदत मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications