Booster Dose: Scientists recommend booster shot after corona vaccination for more antibodies
Booster Dose: कोरोना लसीच्या २ डोसनंतर आता ‘बूस्टर डोस’ घेणं गरजेचे, कारण...; नव्या रिपोर्टमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:03 AM1 / 14संपूर्ण जगासह भारतही कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी त्याचा धोका टळलेला नाही. कोरोना महामारीवर आतापर्यंत कोणताही ठोस औषध न मिळाल्यानं सध्यातरी बचावासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लसीकरण आहे. 2 / 14परंतु आता नवीन शोध होऊ लागला आहे की, कोरोना लस घेतल्यानंतरही अखेर किती दिवस स्वत:ला सुरक्षित ठेवता येऊ शकते. कोरोनाच्या लढाईत प्रत्येक सरकार लोकांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न करत आहे. भारतातही कोविशिल्ड(Covishield) आणि कोव्हॅक्सिन(Covaxin) लस दिली जात आहे. 3 / 14परदेशात फायझर, स्पुतनिकसारख्या अन्य लसी उपलब्ध आहेत. या सर्व लस उत्पादन कंपन्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. आता तज्ज्ञांनी एक नवीन रिपोर्ट समोर आणला आहे. ज्यात फक्त लसीचे दोन डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवता येऊ शकत नाही. 4 / 14कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात पर्याय अँन्टिबॉडीज तयार होतात. यामुळे जेव्हा कधीही कोरोना शरीरात प्रवेश करतो तेव्हा या अँन्टिबॉडीज विषाणूशी मुकाबला करतात आणि त्या व्यक्तीला हानी होऊ देत नाही5 / 14परंतु आता रिसर्चमध्ये सांगितले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत तर शरीरात रोगप्रतिकारशक्ती क्षमता वाढवण्यासाठी आता लसीचा बूस्टर शॉट(Booster Shot) हेदेखील घेणं गरजेचे आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 6 / 14कोरोना लसीच्या परिणांमावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की, कोरोना लस व्यक्तीचा बचाव करू शकते परंतु एक वर्षानंतर लसीपासून निर्माण झालेली अँन्टिबॉडीमध्ये घट होण्यास सुरूवात होईल. त्यासाठी बूस्टर डोस घ्यावी लागेल. 7 / 14त्यामुळे बूस्टर डोस म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचे आहे. एसएन मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसर आरती अग्रवाल यांनी सांगितले की, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आता बूस्टरसाठी काम सुरू आहे. भारत बायोटेकनं अलीकडेच दिल्लीत बूस्टर डोसवर चाचणी घेतली. सहा महिन्यापूर्वी लस घेतलेल्या लोकांवर याची चाचणी केली आहे. त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. 8 / 14बूस्टर शॉट म्हणजे काय? बूस्टर मुख्य स्वरुपात लसीच्या एका किंवा दोन डोसनंतर काही काळाने देण्यात येणारा आणखी एक डोस आहे. जो आपल्या शरीरात असणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला सक्रीय ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अँन्टिबॉडीज पुन्हा एकदा व्हायरसची लढण्यासाठी सक्षम असतात. 9 / 14कोरोना लसीच्या डोसला बूस्टर अपग्रेड करतं. लस घेतल्यानंतर एक किंवा दोन वर्षाच्या कालावधीत बूस्टर डोस घ्यावी लागणार आहे. लसीच्या डोसमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधाप्रमाणे बूस्टर काम करतं. परंतु ते जास्त फायदेशीर आहे. वैद्यकीय प्रमाणानुसार एकत्रच औषधाचा खुराक घेण्याऐवजी छोट्या छोट्या औषधांचा डोस काही अंतरानं घेतला तर तो जास्त फायद्याचा ठरतो. 10 / 14सध्या कोविशिल्डचा परिणाम पाहता दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. म्हणजे समजा, एकाच दिवशी तुम्ही सगळं खाल्लं तर तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मात्र काही अंतरानं जेवणं केले तर ते शरीरासाठी लाभदायक असते. बूस्टरदेखील याच पद्धतीनं काम करतो11 / 14आपल्याकडे बूस्टर डोस लहान मुलांना दिला जातो. जन्मानंतर करण्यात येणारं लसीकरणात दीड वर्षानंतर बूस्टर त्याशिवाय ५ वर्ष, १० वर्ष आणि १६ वर्षापर्यंत बूस्टर डोस दिला जातो. याप्रमाणेच कोरोना लसीकरणानंतर बूस्टर डोस घ्यावी लागणार आहे. परंतु याचा कालावधी कमीही होऊ शकतो. 12 / 14शक्यता आहे की, ही वर्षभर किंवा ५ वर्षाच्या काळातही देता येऊ शकते. सध्या लसीवर काम सुरू आहे. त्यामुळे लसीचे डोस घेतल्यानंतर किती कालावधीत बूस्टर डोस देण्याची गरज पडेल हे स्पष्ट नाही. सध्या एक वर्षाचा कालावधी मानला जात आहे. 13 / 14बूस्टरबाबत आणखी एक सांगितलं जातं ते म्हणजे कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्ससोबत ते लढण्यास सक्षम होऊ शकतं. कोरोना व्हायरसचं म्यूटेट असतं. ते विविध स्वरुपात समोर येते. अशावेळी बूस्टर शॉट त्याच्या आधारे काम करतं. वैज्ञानिकांकडून ते अपग्रेड होऊ शकतं. त्यामुळे व्हेरिएंटसवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. 14 / 14सोमवारी एम्समध्ये ५ लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. बूस्टर डोस अशा लोकांना दिला जात आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेत. भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन तयार केली आहे. ३ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. तेव्हा आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिन लसीला मान्यता देण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications