शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आरोग्य सांभाळा! 'या' चुकीच्या सवयी ठरू शकतात जीवघेण्या; मेंदुवर होईल वाईट परिणाम, व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 2:58 PM

1 / 10
शरीर निरोगी ठेवण्यासोबतच मेंदूच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण संपूर्ण शरीराची कंट्रोल सिस्टम आपला मेंदू आहे. मेंदू नीट काम करत नसेल तर तुम्हाला कोणतेही काम करताना त्रास होतो.
2 / 10
शरीर आणि मेंदू दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. अनेकांना माहीत असूनही किंवा काही जणांच्याकडून नकळत अशा चुका होतात. ज्यामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडत जातं आणि मेंदू कमकुवत होऊ लागतो.
3 / 10
सतत तणाव घेणं मेंदूच्या आरोग्यासाठी घातक आहे. तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या अनेक गोष्टींकडे कमी लक्ष द्या. चुकीच्या सवयींविषयी ज्यामुळे मेंदू हळूहळू खराब होत जातो. त्याबद्दल जाणून घेऊया...
4 / 10
धूम्रपानाच्या सवयीमुळे आरोग्याशी संबंधित प्रॉब्लेम्स तर वाढतातच, पण मेंदूवरही परिणाम होतो. दररोज धूम्रपान केल्यानं तुमची स्मरणशक्ती खराब होऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान करणं बंद करा.
5 / 10
जंक फूड आणि साखरेचे अतिसेवन केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो. रिफाइंड साखरेचे पदार्थ सतत खात राहिल्यानं खाल्ल्याने मेंदूचा विकास मंदावतो.
6 / 10
कमी झोप घेणं आणि उशिरा झोपल्यानं मेंदूच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. सामान्य व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप वेळेवर घेतली पाहिजे. रात्री जागरण करणं हे निसर्ग चक्राच्या विरूद्ध आहे. सतत झोप नीट होत नसल्यास त्याचे मानसिक परिणाम दिसू लागतात.
7 / 10
ज्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही रागावण्याची सवय असते, त्यांचा मेंदू हळूहळू काम नीट करत नाही. कोणताही व्यक्ती रागावतो तेव्हा आपल्या मज्जातंतूंवर ताण येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात. सतत असं होत राहिल्यास मेंदूची शक्ती कमी होऊ लागते.
8 / 10
निष्क्रिय जीवनशैलीचा शरीरावर आणि मेंदूवर मोठा परिणाम होतो. आजकाल लोक 8 तास ते 12 तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात, याचा परिणाम फक्त आरोग्यावरच होत नाही तर मेंदूवरही होतो.
9 / 10
तुम्ही मध्ये ब्रेक घेऊ शकता, ध्यान करू शकता किंवा डोळे मिटून थोडा आराम करू शकता, यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते. तसेच काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या.
10 / 10
काही गोष्टी मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्यामध्ये डार्क चॉकलेट, ग्रीन टी, ब्रोकोली, अक्रोड, बदाम, बेरी, डाळिंब यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)
टॅग्स :Healthआरोग्य