शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळी न चुकता ब्रेकफास्ट कराच, भरपेट ब्रेकफास्ट करणं आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 6:19 PM

1 / 7
अनेकजण सकाळी वेळ नसतो, किंवा भूक नाही सांगत ब्रेकफास्ट करणं टाळतात. मात्र सकाळी ब्रेकफास्ट करणं आरोग्यासाठी गरजेचं आणि फायद्याचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जाणून घेऊयात ब्रेकफास्ट करण्याचे फायदे
2 / 7
रात्रभर आपण झोपलो असल्याने सकाळी शरिराला ऊर्जेची गरज असते. यासाठी ब्रेकफास्ट करणं गरजेचं असते. रात्रीच्या जेवणानंतर सकाळी ब्रेकफास्टपर्यंतचं अंतर खूप जास्त असतं. अशात शरिराला एनर्जी देण्यासाठी आणि अधिक एनर्जेटीक राहण्यासाठी ब्रेकफास्ट अत्यंत आवश्यक आहे. सकाळी केलेल्या ब्रेकफास्टमुळे दिवसभर एनर्जेटिक राहता येतं.
3 / 7
ब्रेकफास्ट केल्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
4 / 7
एका रिसर्चनुसार जे लोक दररोज ब्रेकफास्ट करत नाहीत, त्यांचं वजन अधिक वाढण्याची शक्यता असते.
5 / 7
९० टक्क्यांपैकी प्रत्येक दुसरा व्यक्ती हा डायबेटिजने ग्रस्त आहे. हे त्यांना जास्त वजन आणि व्यायाम न करण्याने भोगावं लागतं. रिसर्चमधून हेही समोर आलं आहे की, रोज ब्रेकफास्ट न केल्याने महिलांना डायबेटिज होण्याची शक्यता अधिक असते.
6 / 7
दररोज ब्रेकफास्ट केल्याने सतत हार्टच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.
7 / 7
ब्रेकफास्ट केल्याने बुद्धीलाही फायदा होतो. ब्रेकफास्टाने मेमरी वाढते
टॅग्स :Healthआरोग्य