Britishers who snore ‘can get up to £156 a week in DWP benefits’ due to medical condition, know more
आई शप्पथ! घोरणाऱ्या नागरिकांना दर आठवड्याला पैसे देतंय 'हे' सरकार; जाणून घ्या का, कशासाठी? By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:34 PM1 / 9आता तुम्हाला घोरण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले तर... होय हे खरं आहे. घोरणारी व्यक्ती आता आठवड्याला जवळपास १५६ पौंड म्हणजेच १४,८०० रुपयांची लाभार्थी ठरू शकते... Department for Work and Pensions म्हणजेच DWP च्या स्किमनुसार अनेकांनी वैद्यकीय स्थितीमुळे या स्किमचा लाभ घेतला आहे. 2 / 9घोरणे ही कृती कोणाला इजा पोहोचवणारी नाही. हा एक Sleep Apnea ( स्लीप एपनिया हा झोपेचा संभाव्य गंभीर विकार आहे ज्यामध्ये श्वासोच्छवास वारंवार थांबतो आणि सुरू होतो.) हा आजार आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते स्लीप एपनिया असलेली व्यक्ती वैयक्तिक स्वातंत्र्य पेमेंट (Personal Independence Payment (PIP)साठी पात्र ठरू शकते.3 / 9PIP हा दीर्घकालीन शारीरिक किंवा मानसिक आजार असलेल्या दिव्यांगाना/व्यक्तिंना दिला जाणारा लाभ आहे. तुम्हीही या लाभासाठी पात्र ठरू शकता, मग तुम्ही काम करत असाल किंवा आधिच अन्य स्किमचा लाभ घेत असलात तरी.. 4 / 9जवळपास ३ दशलक्ष लोकांनी या स्किमचा लाभ घेतला आहे आणि त्यांना आठवड्याला £156 इतके म्हणजेच भारतीय रकमेनुसार १४ हजारापर्यंत मदत मिळत आहे. मात्र, अनेकांना या स्किमची माहितीच नाही. अनेक जण घोरत असल्याचे सांगतही नाही. चिंता, नैराश्य, मधुमेह आणि कमी ऐकू येणे हे आजार असलेली व्यक्तीही या स्किमचा लाभ घेऊ शकते. 5 / 9स्लीप एपनियाचे अनेक आजार आहेत, परंतु त्यातला कॉमन आजार म्हणजे घोरणे. घोरणे हे याचे एक मोठे लक्षण असू शकते कारण असे घडते जेव्हा तुमच्या घशाच्या मागील बाजूचे स्नायू सामान्य श्वासोच्छवासासाठी खूप आराम करतात. ही स्थिती लठ्ठपणा आणि म्हातारी होण्याशी जोडलेली आहे. लंडनमध्ये जवळपास २२१७ लोकांनी या स्किमचा लाभ घेतला आहे. ही स्किम ब्रिटीश लोकांसाठीच आहे आणि त्याचे निकष पुढे दिले आहेत.6 / 9DWP १६ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना PIP देते, ज्यांचे वय पेन्शन योजनेपर्यंत पोहोचलेले नाही, त्यांना याचा लाभ घेता येतो. 7 / 9तुम्ही काम करत असाल किंवा इतर बरेच फायदे मिळत असले तरीही तुम्ही PIP मिळवू शकता.8 / 9हे दर चार आठवड्यांनी दिले जाते आणि त्यानुसार £97.80 आणि £627.60 इतकी आर्थिक मदत मिळू शकते.9 / 9तुम्ही गेल्या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षे इंग्लंड, स्कॉटलंड किंवा वेल्समध्ये वास्तव्य केले असावे आणि तुम्ही अर्ज करता तेव्हा यापैकी एका देशात असायला हवे. आणखी वाचा Subscribe to Notifications