Cardamom water health benefits and how to prepare it
हिरव्या वेलचीचं पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:41 PM1 / 7Cardamom Benefits: वेलची टाकलेला चहा तुम्ही अनेकदा प्यायला असेल. काही वेळा बिर्याणीमध्येही तुम्ही वेलची खाल्ली अशेल आणि शिरा-बासुंदीतही खाल्ली असेल. पण तुम्ही कधी वेलचीचं पाणी प्यायलात का? वेलचीचं पाणी आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. याने तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच, सोबतच ब्लड शुगर आमि कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ वेलचीचं पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे.2 / 7वेलची एक असं फळ आहे जे टेस्टला गोड लागतं आणि तोंडात टाकताच एक फ्रेशनेस जाणवते. वेलची गोड आणि चटपटीत सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये टाकली जाते. तसेच यातील गुणांमुळे वेलची आयुर्वेदीक औषधांमध्येही वापरली जाते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. 3 / 7शरीरातून निघतात टॉक्सिन - वेलचीचं पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी वेलचीचं पाणी फायदेशीर ठरतं. त्यामुळे नियमितपणे वेलचीचं पाणी सेवन करा.4 / 7त्वचेसाठी फायदेशीर - शरीरासोबतच त्वचेसाठीही वेलचीचं पाणी फायदेशीर ठरतं. याने शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. ज्याचा प्रभाव त्वचेवर दिसू लागतो.5 / 7ब्लड शुगरमध्येही फायदेशीर - वेलचीचं पाणी डायबिटीसचे रूग्णही पिऊ शकतात. हे पाणी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतं.6 / 7पचनासाठी फायदेशीर - पचनात होणारी गडबड आणि बद्धकोष्टतेसारख्या समस्यांमध्येही वेलचीचं पाणी पिऊ शकता. या पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.7 / 7कसं कराल तयार - वेलचीचं पाणी तयार करण्यासाठी 5 वेलची घेऊन त्या व्यवस्थित साफ करा. साधारण एक लिटर पाण्यात या वेलची भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी थोडं थोडं हे पाणी प्या. आणखी वाचा Subscribe to Notifications