शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...या कारणामुळे गाजर खाऊनही शरीराला होत नाही फायदा; समोर आलं नवीन संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:36 PM

1 / 9
गाजराला सुपर फूड म्हटलं जातं. गाजरात अनेक पोषक तत्व असतात. गाजर डोळ्यांसाठी आणि हृदयासाठी खूप पोषक असते. या व्यतिरिक्त गाजर अनेक आजार बरे करते. गाजर हा बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, जो शरीरात व्हिटॅमिन ए बनविण्याचे काम करतो. पण एका नवीन अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की गाजर खाण्याचे फायदे प्रत्येकाला मिळत नाही.
2 / 9
हा अभ्यास अमेरिकेच्या इलिनॉय, युनिव्हर्सिटी ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन डिपार्टमेंटचे फूड सायन्स अँड न्यूट्रिशन डिपार्टमेंटचे साहाय्याक प्राध्यापक जॅम इमॅन्युअल यांनी त्यांच्या टीमसह केला आहे. हा अभ्यास मानव आणि उंदरांवर केला होता. हा अभ्यास दाखवतो की गाजरमध्ये असलेल्या बीटा कॅरोटीनने व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी कसे कमी होते. बीटा कॅरोटीन सांधेदुखी देखील प्रतिबंधित करते. एथेरोस्क्लेरोसिसमुळे, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉल जमा होतो आणि यामुळे एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
3 / 9
हृदयावरील बीटा कॅरोटीनचे दुष्परिणाम समजून घेण्यासाठी इमॅन्युअल आणि त्याच्या टीमने दोन अभ्यास केले. इमॅन्युअल यांनी शरीरातील बीटा कॅरोटीनच्या प्रक्रियेचे वर्णन केले. बीटा कॅरोटीन ऑक्सिजन 1 (बीसीओ 1) एजांईम्ससह शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य एकत्रितपणे व्हिटॅमिन ए बनवते. हे एजांईम्स अनुवांशिकदृष्ट्या कमी-जास्त प्रमाणात असू शकतात.
4 / 9
इमॅन्युअल असे म्हणाले की, ''ज्या लोकांमध्ये या एंजाईम्समुळे शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य कमी प्रमाणात असते त्यांना व्हिटॅमिन ए साठी आपल्या आहारात इतर गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील.''
5 / 9
जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या अभ्यासात 18 ते 25 वयोगटातील 767 निरोगी तरुणांचे रक्त आणि डीएनए नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचे विश्लेषण केले गेले. संशोधकांना बीटा कॅरोटीन ऑक्सिजन 1 (बीसीओ 1) एंजाईम्समुळे शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि खराब कोलेस्ट्रॉल पातळी दरम्यानचा संबंध आढळला.
6 / 9
इमॅन्युअल म्हणाले की, ज्या लोकांच्या शरीरात एंजाईम्सना BCO1 ला सक्रिय बनवणारे अनुवांशिक घटक उपस्थित होते. त्यांच्या रक्तात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी दिसून आले. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची पातळी कमी असते त्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असते. या निकालांच्या आधारे, दुसरा अभ्यास उंदीरांवर केला गेला.
7 / 9
हा अभ्यास लिपिड रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, बीटा कॅरोटीन दिलेल्या उंदरांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी होती. या अभ्यासानुसार, ज्या उंदीरांना बीटा कॅरोटीन देण्यात आले होते ते अ‍ॅथेरोस्क्लेरोसिसपासून अधिक सुरक्षित असल्याचे आढळले.
8 / 9
BCO1 एंजाइमचा कॉलेस्ट्रॉलशी महत्वपूर्ण संबंध आहे. रक्तात बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त असणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण कमी सक्रिय BCO1 एंजाइम असे संकेत देतात की, आपल्या आहारात असलेले बीटा कॅरोटीन, व्हिटामीन ए कमी प्रमाणात असणं हे नसण्याप्रमाणे आहे.
9 / 9
जर तुम्ही व्हिटामीन ए ची कमतरता भरून काढण्यासाठी गाजर खात असाल तर फक्त या आहारावर अवलंबून राहण्यापेक्षा डाएटमध्ये व्हिटामीन ए असलेल्या इतर पदार्थांचा समावेश करालला हवा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न