Checking emails after office hours may causes mental and physical harm
सुट्टीच्या दिवशीही मेल्स चेक करता का? वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 10:02 AM1 / 9 तुम्ही सुध्दा ऑफिसची वेळ संपल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी पण मेल्स चेक करत असाल तर ही फार गंभीर बाब आहे. यामुळे आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सुध्दा ही सवय असेल तर महागात पडू शकत. तर मग जाणून घ्या या सवयीचे शरीरावर काय परीणाम होतात. 2 / 9आपल्या मनात अशी भावना येत असेल की आसपासची लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर अश्यावेळीही मोबाईल व्हायब्रेट होण्याचे भास होऊ शकतात. त्याकारणाने लोक मोबाईल चेक करतात. 3 / 9सतत मोबाइल चेक करण्याची सवय लागल्यानं बरेचजण घरी असतील तरी वेळेतला बराचसा वेळ व्हॉटसअॅप, एफबी, इमेल्स नोटिफिकेशन्स आणि इतर गोष्टींमध्ये घालवत असतात.4 / 9जर तुम्ही घरी असताना सुध्दा ऑफिसमध्ये होणाऱ्या गोष्टींचा विचार करत असाल तर ताणच तणावाचं कारणं ठरू शकत.5 / 9ऑफिसमध्ये असताना सतत मेल पाठवणं रीप्लाय देणं. यामुळे नकळतपणे प्रेशर निर्माण होऊन मानसीक स्थिती अस्वस्थ होते. 6 / 9सतत ऑफिसच्या कामांचा विचार करून राग येणे, चिडचिड होणे यांसारख्या समस्या होतात. कालांतराने कुटूंब, मित्र-परीवार यांना वेळ देता येत नाही. मोबाईलच्या वापराचे व्सन जडते. 7 / 9यामुळे मानसीक तसंच शारीरिक समस्या उद्भवतात. डोकेदुखी, चक्कर येणे, अंगदुखी, कॉन्स्टीपेशन यांचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर या ताणाचा नकारात्मक परीणाम होऊन स्मरणशक्ती कमजोर व्हायला सुरूवात होते.8 / 9अशावेळी होणारा त्रास रोखण्यासाठी घरी असताना ई-मेल्सच्या माध्यामातून इतरांना सुट्टीवर असल्याचा संदेश द्या. जेणे करून तुम्हाला तणावमुक्त राहून सुट्टीचा आनंद घेता येईल. 9 / 9अशावेळी होणारा त्रास रोखण्यासाठी घरी असताना ई-मेल्सच्या माध्यामातून इतरांना सुट्टीवर असल्याचा संदेश द्या. जेणेकरून तुम्हाला तणावमुक्त राहून सुट्टीचा आनंद घेता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications