Chennai 8 year old boy 1st case of covid 19 inflammatory syndrome kawasaki myb
भारतात कोरोनानंतर आता नव्याचं रोगाची भीती; आठ वर्षांच्या मुलात आढळली लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:46 PM1 / 11कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. आधीच कोरोनाच्या माहामारीची भीती लोकांच्या मनात असताना आता कोरोनाशी निगडीत आजारांचा प्रसार भारतात वाढू लागला आहे. अमेरिका आणि उत्तर युरोपीय देशांमध्ये असणारा आजार भारतातील लहान मुलांना सुद्धा उद्भवत आहे. 2 / 11हाइपर-इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. चेन्नईतील एका आठ वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसशी निगडीत असलेल्या हाइपर-इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लागण झाली आहे. या आजारात शरीरातील अवयवांवर परिणाम होऊन सूज येते. गंभीर स्थितीत जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते.3 / 11या आजारात अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यात अडचण येणे, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणे आणि थकवा या आजाराची इतर लक्षणे आहेत. कावासाकी हा एक रहस्यमय रोग आहे ज्यामुळे ५ वर्षांच्या मुलांच्या नसा फुगतात. ताप येतो. त्वचेवर डाग येतात. सांधेदुखी असते असे न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू क्वोमो यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. 4 / 11कोरोनाने संक्रमित असलेल्या या लहान मुलाला गंभीर स्थितीत चेन्नईच्या कांची कामकोटी चाइल्डस ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा या मुलाला आयसीयूत भरती करण्यात आलं. या मुलाच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन संपूर्ण शरीराला सूज आली होती. त्यावेळी जीवघेण्या कावासाकी आजाराची लक्षणं दिसून आली. 5 / 11सुरुवातीच्या तपासणीदरम्यान सेप्टिक शॉक, निमोनिया, कोविड 19, न्युमोनिया आणि कावासाठी या आजारांची लक्षणं दिसून आली. याशिवाय या मुलाच्या शरीरात हाइपर-इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या लक्षणांना इम्युनोग्लोबुलिन आणि टोसीलीजुंबॅब या औषधांचा वापर करून बरं करण्यात आलं.6 / 11रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार या आजाराने बाधित असलेल्या लहान मुलगा दोन आठवड्यांनंतर बरा झाला. या आधी लंडनमध्ये लहानमुलांमध्ये हा आजार आढळून आला होता. सध्या अमेरिकेत सुद्धा या आजाराने पाय पसरायला सुरूवात केली आहे.7 / 11आकडेवारीनुसार हा आजार वयस्कर लोकांच्या तुलनेत लहानमुलांमध्ये आणि तरूणांमध्ये जास्त आढळून येत आहे. WHO ने जगभरातील शास्ज्ञांचा एक गट तयार केला आहे. ज्याद्वारे कमी वयोगटातील लोकांना होत असलेल्या या आजाराबाबत माहिती मिळू शकेल.8 / 11कावासाकी हा आजार रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. या आजारात रक्तवाहिन्यांवर असलेल्या आवरणाला सूज येते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करत असलेल्या धमन्या कमकुवत होतात. गंभीर स्थितीत हार्ट फेल्योर किंवा हार्ट अर्टक येण्याची शक्यता असते. 9 / 11कावासाकी हा आजार रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. या आजारात रक्तवाहिन्यांवर असलेल्या आवरणाला सूज येते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करत असलेल्या धमन्या कमकुवत होतात. गंभीर स्थितीत हार्ट फेल्योर किंवा हार्ट अर्टक येण्याची शक्यता असते. 10 / 11कावासाकी हा आजार रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. या आजारात रक्तवाहिन्यांवर असलेल्या आवरणाला सूज येते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करत असलेल्या धमन्या कमकुवत होतात. गंभीर स्थितीत हार्ट फेल्योर किंवा हार्ट अर्टक येण्याची शक्यता असते. 11 / 11कावासाकी हा आजार रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. या आजारात रक्तवाहिन्यांवर असलेल्या आवरणाला सूज येते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करत असलेल्या धमन्या कमकुवत होतात. गंभीर स्थितीत हार्ट फेल्योर किंवा हार्ट अर्टक येण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications