children have to face these problems due to lack of blood
सावधान! मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 3:35 PM1 / 8लहान मुलांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सध्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येत आहे. 2 / 8लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.3 / 8लहान मुलांची पचन क्षमता जास्त असते. त्यामुळे त्यांना जास्त भूक लागते. मात्र हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास भूक लागत नाही.4 / 8मुलांना जास्त सुस्ती येत असेल तसेच कोणतेही काम न करता किंवा न खेळता हे थकून जात असतील तर हिमोग्लोबिनची कमतरता असते. 5 / 8शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर त्वचा पिवळी होते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करा. 6 / 8अनेकदा लहान मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतात. त्यामुळे त्यांची नीट काळजी घ्या. 7 / 8हिमोग्लोबिनची कमी असल्यास लहान मुलांची उंची आणि वजन वाढत नाही.8 / 8लहान मुलांना मिनरल्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहार दिल्यास ही हिमोग्लोबिनची कमतरता दूर करता येते. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.) आणखी वाचा Subscribe to Notifications