China also approves one dose Covid-19 vaccine attempts to challenge Johnson Johnson
आता चीननंही दिली 'सिंगल डोस' कोरोना लशीला मंजुरी, जॉन्सन अँड जॉन्सनला टक्कर देण्याचा प्रयत्न By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 28, 2021 10:58 PM1 / 8अमेरिकेपाठोपाठ चीननेही 'सिंगल डोस' कोरोना लशीला सशर्त मंजुरी दिली आहे. चीनची ही लस म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची प्रतिस्पर्धक मानली जात आहे. 2 / 8यूएस ड्रग रेग्युलेटरने शनिवारी कोरोनापासून बचावासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लशीला परवानगी दिली.3 / 8यानंतर चीनचे सरकारी वृत्त पत्र ग्लोबल टाइम्सने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी चीनने पहिली ‘अॅड5-एन कोवी’ लस उपलब्ध करून दिली आहे.4 / 8प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी 16 मार्चला या लशीच्या पहिल्या टप्प्यावरील परीक्षणाला सुरूवात झाली होती. यानुसार, क्लीनिकल परीक्षण झालेली हीच जगातील कोविड-19 ची, अशी पहिली लस होती. 5 / 8या वृत्तात, चायना सेंट्रल टेलीव्हिजनने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत सांगण्यात आले आहे, की चीनने सशर्त मंजुरी दिलेली ही पहिली कोरोनाची 'सिंगल डोस' लस आहे.6 / 8प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या लशीचा प्रभाव किमान सहा महिन्यांपर्यंत राहू शकतो.7 / 8महत्वाचे म्हणजे सहा महिन्यानंतर या लशीचा दुसरा डोस घेतल्यास, प्रतिकार शक्ती 10 ते 20 टक्क्यांनी वाढते.8 / 8महत्वाचे म्हणजे सहा महिन्यानंतर या लशीचा दुसरा डोस घेतल्यास, प्रतिकार शक्ती 10 ते 20 टक्क्यांनी वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications