China Coronavirus covid 19 prevention tips carry these things to prevent corona SSS
China Coronavirus : कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 2:09 PM1 / 12वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 3,286 जणांचा मृत्यू झाला असून 95,484 हून अधिक लोकांना त्यांचा संसर्ग झाला आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. 2 / 12भारतात देखील कोरोनाचे 29 रुग्ण आढळले आहेत. योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनापासून आपला बचाव करता येऊ शकतो. काही गोष्टी बॅगेत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याबाबत जाणून घेऊया.3 / 12कोरोनापासून बचाव करण्यासाठी हायजीन म्हणजे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. संपर्कात आल्याने देखील काही मिनिटांत कोरोनाचा संसर्ग होतो.4 / 12निरोगी असाल तर मास्क वापरण्याची गरज नाही. पण जर तुम्ही कोरोनाग्रस्त व्यक्तीची काळजी घेत असाल तर मास्कची गरज आहे. तसेच ज्या लोकांना ताप, कफ, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यांनीही मास्क वापरावा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा5 / 12शिंकताना किंवा खोकताना, नाक आणि तोंडावर रुमाल अथवा टिश्यू ठेवा. टिश्यूचा वापर करून झाल्यानंतर तो फेकून देता येतो. 6 / 12हात थोड्या थोड्या वेळाने सॅनिटायजरने किंवा साबणाने चांगले स्वच्छ करा. अल्कोहल बेस्ट सॅनिटायजर नेहमी सोबत ठेवा. 7 / 12कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. हात धुण्यासाठी साबणाचा वापर करा. एक लहान साबण अथवा पेपर सोप बॅगेत ठेवणं नेहमीच उत्तम आहे. 8 / 12पिण्यासाठी प्रामुख्याने पाण्याचा वापर केला जातो. आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल ठेवा. म्हणजे प्रवासादरम्यान पिण्यासोबतच हात धुण्यासाठी देखील त्याचा वापर करता येईल. 9 / 12वेट वाइप्सचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्रेन, बसने प्रवास करताना वेट वाइप्सचा वापर करणं उपयुक्त ठरतो. शेकहँड केल्यानंतर वेट वाइप्सचा वापर करता येतो.10 / 12प्रवास करताना कीटकनाशक स्प्रे सोबत ठेवा. तसेच खाद्यपदार्थ घेण्यापूर्वी आपले हात नीट स्वच्छ करा. 11 / 12स्मार्टफोनचा डिस्प्ले स्वच्छ करा. आपल्या हातात 24-तास स्मार्टफोन असल्याने त्याच्या स्क्रीनवर व्हायरस असण्याची शक्यता आहे. 12 / 12ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल त्यांच्याजवळ जाऊ नका. तुमच्यातही अशीच लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. आणखी वाचा Subscribe to Notifications