By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 17:00 IST
1 / 9चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रसारात आता नवीन आजारानं मान वर काढली आहे. या आजारानं १०० डुकरांमध्ये संक्रमण पसरलं आहे. हा आजार स्वाईन फिव्हर असल्याचे सांगितले जात आहे. आफ्रिकन स्वाइन फिव्हरच्या नवीन स्ट्रेननं डुकरांना संक्रमित केलं आहे. चीनमध्ये डुकरांचे मास मोठ्या प्रमाणवर विकले जाते. हेल्थ आणि मार्केट तज्ज्ञांनी या आजाराच्या येण्यामुळे चीनचं नुकसान होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली आहे. 2 / 9चीनची चौथी सगळ्यात मोठी पोर्क विक्रेती कंपनी न्यू होप लिऊहीने सांगितले की, ''१०० डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरचे दोन स्ट्रेन दिसून आले आहेत.'' कंपनीचे चीफ साइंस ऑफिसर यान झिचून यांनी सांगितले की, ''या फिव्हरच्या संक्रमणामुळे डुकरं प्रमाणापेक्षा जास्त जाड होत आहेत.'' 3 / 9न्यू होपप्रमाणेच अनेक पोर्क निर्माण कंपन्या या आजारानं चिंतेत आहेत. सध्या स्वाईन फिव्हर कमी प्रमाणत पसरला असून नवीन स्ट्रेनचा वेगानं प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोर्क निर्माण कंपन्या घाबरत आहेत कारण दोन वर्षांपूर्वी ४० कोटी डुकरांमधून जवळपास अर्ध्यांना मारून टाकण्यात आलं होतं. 4 / 9यान यांनी सांगितले की,'' कोरोनाकाळात चीनमध्ये खाण्यापिण्याच्या सुरक्षेबाबत नवीन नियम घालण्यात आले आहेत. त्यामुळे डुकरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. सध्या चीनमध्ये पोर्कच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. चीनमधील डुकरांना या आजाराची लागण कशी झाली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. ''5 / 9बीजिंगमधील जीवतज्ज्ञ वाएन जॉनसन यांनी सांगितले की मागच्या वर्षी डुकरांमध्ये हा जीवघेणा आजार दिसून आला होता. पण त्यावेळी या आजारात व्हायरसचे जेनेटीक घटक कमी प्रमाणात होते. या व्हायरसला MGF360 म्हटलं जात आहे. न्यू होप च्या डुकरांमध्ये जे स्ट्रेन मिळाले त्यात MGF360, CD2V जीन नाहीत. 6 / 9रिचर्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार स्वाईन फिव्हरमध्ये MGF360 जीन काढून टाकल्यामुळे लसीविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विकसित होते. या जीनला कसं बाजूला करता येऊ शकतं याबाबत शास्त्रज्ञांना कल्पना नाही.7 / 9 हा स्ट्रेन पुढे अधिक संक्रामक ठरू शकतो म्हणून असून लस तयार करण्यात आलेली नाही.8 / 9नैरोबी इंटरनॅशनल लाईवस्टॉक रिसर्च इंस्टीट्यूट च्या तज्ज्ञ लुसिला स्टेना यांनी सांगितले की, ''या आजाराच्या व्हायरसचा जीनोम सिक्वेंस तयार करून त्यात त्यात MGF360 जीन सक्रिय केल्यानं कोणताही फायदा होणार नाही. 9 / 9कारण हा जीन स्वतःच वेगळा होत आहे. तो व्हायरसमध्ये कशाप्रकारे म्यूटेट होत आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. ''