शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कडू पण अत्यंत गुणकारी! कारलं पाहून नाक मुरडता?; 'हे' फायदे समजताच आवडीने खाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:18 PM

1 / 9
चवीला कडू असल्यामुळे फार कमी लोकांना कारलं खायला आवडतात. मात्र या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात.
2 / 9
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...
3 / 9
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, कारल्याचे रोज सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. कारल्यामध्ये आढळणारे विशेष गुणधर्म इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.
4 / 9
कारलं हा हृदयाशी संबंधित समस्यांवर उत्तम उपाय आहे. खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका देखील खूप कमी होतो.
5 / 9
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्व देखील असतात जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात.
6 / 9
कारल्याच्या सेवनाने शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्यामुळे रक्ताशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
7 / 9
कारल्यामध्ये अल्फा-लिपोइक एसिड नावाचे औषधी गुणधर्म देखील असतात, जे रक्तातील चरबी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.
8 / 9
कारल्यातील फ्लेव्होनॉइड्स, गार्डनिया आणि बीटा-कॅरोटीन सारखे केमिकल कम्पाऊंड कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅन्सरशी लढण्यासाठी कारल्याचा रस सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.
9 / 9
कारलं केवळ मधुमेहच नाही तर बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. कारल्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स