शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आशेचा किरण! आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 9:57 AM

1 / 10
ब्रिटेनमधील डॉक्टरांनी क्लिनिकल ट्रायल सुरु केले आहेत. त्यामुळे कोविड19 सारख्या गंभीर आजारावर मात करता येऊ शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या लोकांमध्ये टि सेल्स कमी होतात. हेच टी सेल्स आाजाराला शरीरातून बाहेर फेकण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.
2 / 10
या क्लिनिकल ट्रायलमध्ये किंग्स कॉलेज लंडन ते फ्रांजसिस क्रिक इंस्टीट्यूट आणि गाएज एंड सेंट थॉमस हॉस्पिटलचे शास्त्रज्ञ सहभागी असतील. हे संशोधक कोरोना रुग्णांमध्ये इंटरल्यूकिन 7 नावाचे औषध टी सेल्स वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेलल का? याचे अधिक परिक्षण करणार आहेत. साधारणपणे इतर आजारांशी लढा देत असलेल्या रुग्णांमध्ये टी सेल्सची संख्या वाढवण्याासाठी इंटरल्यूकिन 7 चा वापर केला जातो.
3 / 10
इम्यून सिस्टीम : चाचणीमध्ये समील असलेल्या डॉक्टरांनी कोरोनाबाधीत असलेल्या ६० रुग्णांची तपासणी केली. त्यातून त्यांना दिसून आलं की, या रुग्णांमध्ये टी सेल्सची कमतरता आहे. क्रिक इंस्टट्यूट के प्रोफेसर एड्रियन हेडे यांनी दिेलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस ज्या प्रमाणे इम्यून सिस्टीमला नुकसानाकारक ठरतो. ही स्थिती खूपच आश्चर्यकारक आहे.
4 / 10
त्यांनी सांगितले की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आजारांविरूद्ध लढते. पण कोरोना व्हाायरसचं संक्रमण झाल्यामुळे टी सेल्सची संख्या कमी होते. एका निरोगी वयस्कर व्यक्तीमध्ये साधारणपणे २ हजार ते ४ हजार टी सेल्स असतात. त्यांना टी लिम्फोसाईट्स असं सुद्धा म्हणतात. डॉक्टरांच्या परिक्षणातून दिसून आलं की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये ही संख्या २०० ते १ हजार एव्हढीच होती.
5 / 10
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोरोना रुग्णाच्या शरीरातील टी सेल्सची संख्या वाढवण्याासाठी खास टेस्ट तयार केली जाऊ शकते. ज्यामुळे आजारांशी लढण्यासाठी टी सेल्सची संख्या वाढू शकते.
6 / 10
गाएज एंड सेंट थॉमस हॉस्पिटलमधील क्रिटिकल केयर कन्सल्टेन्ट मनु शंकर हरि यांनी सांगितले की, इन्टेन्सिव केयरमध्ये येत असलेल्या ७० टक्के रुग्णांमध्ये जवळपास प्रती मायक्रोलीटर रक्तात ४०० चे ८०० टी सेल्सस असतात. जसजसे रुग्ण बरे होतात. तसतसं त्याच्या शरीरातील टी सेल्सची संख्या वाढू लागते. सेप्सिसनेबाधीत असलेल्या एका रुग्णांच्या समुहावर इंटरल्यूकिन 7 चे परिक्षण करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.
7 / 10
या क्लिनिकल ट्रायलसाठी लिम्फोसाईट काऊंट असलेल्या रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे. जे तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ क्रिटिकल केअरमध्ये असणार आहे. शंकर हरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरातील टि सेल्सची संख्या वाढण्यासोबत संक्रमणही संपेल.
8 / 10
कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस इम्यून सिस्टीम नष्ट करतो. प्रोफेसर एड्रियन हेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरू शकते. व्हायरस कोणत्या पद्धतीने टी सेल्सना नष्ट करतो. याबाबत माहिती प्राप्त झाली नसल्याचे तज्ज्ञानी सांगितले.
9 / 10

10 / 10

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या