शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो? कसं काय? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 8:25 PM

1 / 6
clove tea benefits: लवंग अतिशय गुणकारी असतं. त्यामुळे लवंग टाकून केलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. लवंगाचा चहा प्यायल्याने पचन क्रियेशी संबंधी सर्व सर्व विकार दूर होतात. लवंग शरीरातील पचनसंस्थेला बळ देतं आणि अॅसिडीटी कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे जेवणाच्या अर्ध्यातास आधी लवंगाचा चहा घेतला की तो फायदेशीर ठरतो.
2 / 6
लवंगाचा चहा दातदुखीवरही रामबाण उपाय आहे. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे दातदुखीची समस्या असणाऱ्यांना आराम मिळतो. याशिवाय अंगदुखीवरही लवंगाचा चहा परिणामकारक ठरतो.
3 / 6
सर्दीच्या समस्येवरही लवंगाचा चहा उपयोगी ठरतो. लवंग मूळातच गरम असल्यानं थंडीच्या दिवसात तो फायदेशीर आहे. यामुळे सर्दी, खोकला दूर होतो.
4 / 6
. सायनस आणि छातीत कफ जमा झालेल्या समस्येवरही लवंगाचा चहा परिणामकारक आहे. कफ बाहेर पडण्यासाठी लवंग उपयोगी आहे आणि तुम्हाला जर सायनसचा त्रास असेल तर दररोज सकाळी लवंग मिश्रित चहा घेतल्यानं इन्फेक्शन संपुष्टात येईल. यामुळं सायनसच्या त्रासातून आराम मिळतो.
5 / 6
लवंगमध्ये असलेल्या युगेनॉलच्या गुणधर्मामुळे श्वसन क्रियेशी निगडीत समस्यांवरही रामबाण उपाय ठरतो. अस्थमाचा त्रास असलेल्यांनी दिवसातून तीन वेळा लवंगाचा चहा घेतल्यानं आराम मिळतो.
6 / 6
एक कप पाण्यात दोन-तीन लवंगाचे तुकडे चांगले उकळावेत. त्यात अर्धा चमचा चहापत्ती टाकावी. त्यानंतर चहा गाळून घेऊन त्यात थोडं मध टाकावं आणि चहाचं सेवन करावं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHealthy Diet Planपौष्टिक आहार