शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:44 AM

1 / 11
सध्या मानदुखीमुळे अनेक जण त्रस्त आहेत. काही वेळा मानदुखीच्या वेदना पाठ आणि छातीवरही परिणाम करतात. गेल्या काही वर्षांत बैठ्या कामामुळे नागरिक चुकीच्या पद्धतीने (पुअर पोश्चर) खुर्चीवर बसतात.
2 / 11
अनेक जण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर झुकल्यासारखे खुर्चीवर बसलेले असतात. त्यामुळे मानेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. परिणामी, मानदुखीचा आजार जडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
3 / 11
स्मार्टफोन आणि स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे नागरिक मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसतात. त्यात ते तासनतास व्यस्त राहतात, तसेच कसेही रेटून बसणे यामुळेही मानेवर ताण येतो.
4 / 11
झोपताना आपण कोणती उशी घेतो, यावर मानेचे आरोग्य अवलंबून असते. जाड उशीमुळे मानेचा त्रास होतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी पातळ उशी वापरण्याचा सल्ला देतात. गेल्या काही वर्षांत मोबाइल गेमिंगने तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. त्यासोबत आता वेबसिरीज सुरू झाल्या आहेत.
5 / 11
अनेक जण दंग असतात. रात्रंदिवस ते लॅपटॉप, टीव्ही आणि मोबाइलमध्ये असतात. त्यांच्या या अशा वागण्यामुळे मुंबईतील सर्वच ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांकडे मानदुखीच्या तक्रारींचे रुग्ण सध्या वाढले आहेत.
6 / 11
तरुणांची संख्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. काही तरुण तर स्वतःच्या मनाने वेदनाशामक (पेनकिलर) गोळ्या घेऊन दिवस ढकलत असतात.
7 / 11
मानदुखीची लक्षणे - १) एकाच हाताला मुग्या आल्यासारखे वाटणे. २) मानेच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना होणे. ३) काही वेळा चक्कर आल्यासारखे वाटणे. ४) पाठ दुखी
8 / 11
काय काळजी घ्याल? १) बसण्याची पद्धत बदला. २) खुर्चीला पाठ टेकून बसा. ३) ज्या टेबल आणि खुर्चीचा तुम्ही नियमितपणे वापर करता त्याची उंची पाहून घ्या.
9 / 11
४) खुर्चीला दोन्ही बाजूला हाताला आधार देता येईल, अशी व्यवस्था असावी. ५) मानेचे दुखणे वाढल्यास डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. ६) उगाचच वेदनाशामक गोळ्या घेऊ नये.
10 / 11
आधुनिक जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणावर तरुणांना मानदुखी जाणवत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणारे १० पैकी २ रुग्ण हे मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे मानदुखी आणि पाठदुखीचे असतात. काहींना फिजिओथेरपीच्या साहाय्याने उपचार दिले जातात. मानदुखी टाळण्यासाठी खुर्चीवर बसण्याची शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे.
11 / 11
आपण किती वेळा स्क्रीनला देतो याचे मोजमाप करण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांत मानदुखी आणि पाठदुखीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. यासाठी नागरिकांनी नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम केला पाहिजे - डॉ. नादीर शहा, सहयोगी प्राध्यापक, ऑर्थोपेडिक विभाग, जे. जे. रुग्णालय
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स