Congo fever symptoms prevention and treatment know all about congo hemorrhagic fever cchf alert
भय इथले संपत नाही! कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा By manali.bagul | Published: September 30, 2020 11:51 AM1 / 9कोरोनाच्या माहामारीत अनेकजण व्हायरल फ्लू, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करत आहेत. आता कांगो तापाने लोकांची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हा आजार जास्त पसरू नये यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. 2 / 9. कांगो ताप म्हणजे क्रायमियन कांगो हेमरेजिक फीवर असतो.(CCHF) यापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण या आजारावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेलं नाही. साधारणपणे कोरोनाची सुरूवातीची सुरूवातीची लक्षणं जशी असतात. तशीच या आजाराची लक्षणं असतात. 3 / 9पालघर जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची माहामारी डोळ्यासमोर ठेवता मास विक्रेते आणि पशूपालक यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. पालघर पशुपालन विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रशांत डी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या काही जिल्ह्यामध्ये अनेकांना तापची समस्या उद्भवत आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये माहामारी पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या आजाराबाबत महत्वाच्या गोष्टी.4 / 9हा आजार कसा पसरतो?: कांगो ताप एक व्हायरल आजार आहे. एका विशिष्ट किड्याद्वारे एका प्राण्यातून इतर प्राण्यांमध्ये पसरतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेवर या आजाराच्या प्रसाबाबत माहिती न मिळाल्यास धोका उद्भवू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास ३० टक्के रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागतो. या आजारांवर प्राण्यांसाठी किंवा माणसांसाठी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.5 / 9कांगो तापाची लक्षणं: कांगो तापचा लागण झाल्यानंतर सगळ्यात आधी ताप आणि डोकेदुखी, मासपेंशीमध्ये वेदना व्हायला सुरूवात होते, चक्कर येणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्यांवर उजेड पडल्यास जास्त वेदना होतात,6 / 9 घसा बसणं, पाठदुखी, कंबरदुखी, तोंडातून किंवा नाकातून रक्त बाहेर येणं7 / 9शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर नकारात्मक परिणाम: महाराष्ट्रातील पालघर जिल्हा गुजरातमधील वलसाड जिल्याच्याजवळ आहे. अशा स्थितीत पालघर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 8 / 9प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. याद्वारे हा आजार कसा पसरतो याबाबत माहिती दिली आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास मृत्यूचाही सामना या आजारामुळे करावा लागू शकतो. 9 / 9कोरोनाच्या माहामारीत आता या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications