corona 4th wave covid 19 virus may spread through animals WHO gives 4 tips to stop the spread
Corona 4th Wave: कोरोनाचा विषाणू आता प्राण्यांवाटे पसरण्याची शक्यता, प्रसार रोखण्यासाठी WHO ने दिल्या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 6:08 PM1 / 10अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की कोरोनाची तिसरी लाट संपताच (Covid 3rd wave) आणि ओमिक्रॉन शांत होताच कोरोना विषाणूने मिंक्स आणि हॅमस्टर्सना संक्रमित केले आहे. इतकेच काय तर या व्हायरसने उत्तर अमेरिकेतील जंगली पांढऱ्या शेपटीच्या हरणांना सुद्धा संक्रमित केले आहे.2 / 10संशोधकांना आता भीती वाटू लागली आहे की हा विषाणू अधिक प्रजातींच्या जनावरांना किंवा प्राण्यांना संक्रमित करू शकतो आणि मानवांमध्ये परत येऊ शकतो आणि नवीन धोकादायक रूपाने धुमाकूळ माजवू शकतो.3 / 10संशोधकांच्या इशाऱ्यांना गांभीर्याने घेऊन WHO शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे की आपण सर्वांनी SARS-CoV-2 चा प्रसार कमी करण्यासाठी आणि प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ते थांबवण्यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत.4 / 10कोरोना व्हायरस आणि प्राणी यांच्यावर आजवर जितका अभ्यास झाला त्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे की हा व्हायरस काही प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आहे, उदा - कुत्रे आणि मांजरी. पण प्राण्यांपासून माणसांना संसर्ग होऊ शकतो का याबद्दल अजून पुरेशी माहिती समोर आलेली नाही आणि यावर अजूनही अभ्यास चालू आहे.5 / 10मिंक प्राण्यांची कातडीला (फर) फार किंमत असते, त्यांची कातडी कमावण्यासाठी अनेक पाश्चात्य देशांमध्ये मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात. जगभरात इतरही ठिकाणी, जिथे मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात अशा ठिकाणहून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.6 / 10याआधी डेन्मार्क आणि नेदरलँड्समध्ये असं घडलं आहे. या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर फरचं उत्पादन होतं.7 / 10राष्ट्रीय पशु वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरण यांच्यातील सहकार्य मजबूत करणे हे प्राण्यांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे आहे.8 / 10वन्यजीव किंवा प्राण्यांवर लक्ष ठेवण्यास बढावा दिला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त SARS-CoV-2 ला संभाव्य संवेदनाक्षम समजल्या जाणार्या वन्य प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी केली जावी. प्राण्यांचा अनुवांशिक सिक्वेंस डेटा सामायिक करावा.9 / 10SARS-CoV-2 च्या पुष्टी झालेल्या प्राण्यांची प्रकरणे जागतिक प्राणी आरोग्य माहिती प्रणाली (OIE-WAHIS) ला कळवावी. बाजारात पकडलेल्या जिवंत वन्य सस्तन प्राण्यांच्या विक्रीला स्थगिती द्यावी.10 / 10चुकीची माहिती पसरू नये म्हणून प्राण्यांमधील विषाणू विषयी संदेश काळजीपूर्वक तयार करा. याव्यतिरिक्त, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही प्राण्याला संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी याची काळजी घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications