शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Side Effects: कोरोना होऊन गेल्यानंतर होतोय 'हा' गंभीर आजार, वैद्यकीय तज्ज्ञही चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 4:19 PM

1 / 10
कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला असला तरी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा अजूनही सुरू आहे. कोरोना होऊन गेलेल्यांना त्यानंतरही त्याचा त्रास जाणवत होता. अनेकांमध्ये हृदयविकार बळावल्याचे निदर्शनास आले आहे.
2 / 10
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हृदयाच्या ठोक्यांत वाढ झाल्याचे आढळले आहे.
3 / 10
त्यामुळे हृदयविकारांत वाढ होऊन टॅचिकार्डिया नावाचा आजार बळावल्याचे निदर्शनास आले आहे.
4 / 10
हृदयाच्या ठोक्यांत प्रमाणापेक्षा वाढ होण्याच्या स्थितीला टॅचिकार्डिया असे संबोधले जाते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांत ही स्थिती आढळून येते.
5 / 10
कोरोनापूर्व स्थितीत ज्या लोकांना कामाचा तणाव जाणवत होता त्यांच्यात कोरोनातून बरे झाल्यावर हृदयविकारांत वाढ झाल्याचे दिसले.
6 / 10
कोरोनातून बरे झाल्यावर हार्ट ॲटॅकची जोखीम तीन  ते आठ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. लॅन्सेटच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
7 / 10
८७ हजार लोकांवर यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यात ५७ टक्के महिलांमध्ये कोरोनातून बरे झाल्यावर रक्तात गुठळ्या निर्माण होणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढण्याचे संकेत आढळून आलेे.
8 / 10
या लक्षणांकडे  करू नका दुर्लक्ष : छातीत सतत धडधडणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, कमालीचा थकवा येणे, श्वसनात अडचणी 
9 / 10
हृदयविषयक कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने ईसीजी वा ईको चाचणी करून घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
10 / 10
कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येकाने ठरावीक अंतराने शारीरिक तपासण्या करून घेणे केव्हाही चांगले, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग