Corona Antibodies: How many months can antibodies last after corona? Read detailed
Corona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने शरीरात राहू शकतात अँटीबॉडीज? वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:42 AM1 / 10कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकांचे देशभर लसीकरण करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात व्हायरसचा धोका कमी होऊ शकेल. दरम्यान, इटालियन संशोधकांनी या कोरोनाच्या आजारानंतर शरीरातील अँटीबॉडीजविषयी महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोविड -१९ संसर्ग झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज असतात.2 / 10मिलानच्या सॅन राफेल हॉस्पिटलने म्हटले आहे की, या अँटीबॉडीज आजाराची गंभीरता, रुग्णाचे वय किंवा कोणत्याही आजार असूनही या अँटीबॉडीज रक्तात असतात. एक्सपर्ट्स म्हणतात की, जोपर्यंत कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज शरीरात राहील तोपर्यंत व्हायरसचा धोका कमी होतो.3 / 10इटलीच्या आयएसएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने संशोधक यावर काम करत आहेत. स्टडीसाठी त्यांनी कोरोना व्हायरसची लक्षणे असलेले 162 रुग्णांचा समावेश केला होता, ज्यामध्ये गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान आपत्कालीन कक्षात ठेवले गेले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने सुरवातीला मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले आणि त्यानंतर जे लोक जिवंत होते, त्यांचे रक्त नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. यामधील जवळपास 29 रुग्णांचा मृत्यू झाला.4 / 10'आयएसएस'सोबत शेअर केलेल्या निवेदनात संशोधकांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर या रूग्णांच्या शरीरात आजाराशी लढणाऱ्या अँटीबॉडीज असल्याचे आढळले. यापैकी केवळ तीन रूग्ण असे आढळून आले की, ज्यांच्या शरिरात दीर्घकाळापर्यंत अँटीबॉडीज नव्हते.5 / 10ही स्टडी 'नेचर कम्युनिकेशन्स सायंटिफिक जर्नल' मध्ये प्रसिद्ध झाली आहे. स्टडीमध्ये संशोधकांनी कोरोना व्हायरसपासून रिकव्हरीमध्ये अँटीबॉडीजच्या विकसित होण्याच्या महत्त्वावर देखील जोर दिला आहे.6 / 10कोरोनामुळे गंभीरपणे आजारी पडलेल्या रूग्णांबद्दलही संशोधकांनी विशेष माहिती दिली. त्यांनी नोंदविले की, जे रुग्ण संक्रमणाच्या 15 दिवसांच्या आत अँटीबॉडीज तयार करण्यात अयशस्वी झाले, त्यांना कोविड -१९ चा घातक प्रकार होण्याचा धोका जास्त असतो.7 / 10या स्टडीत दोन तृतीयांश पुरुषांचा समावेश होता, ज्यांचे सरासरी वय 63 होते. यापैकी जवळपास 57 टक्के रुग्ण असे होते जे आधीपासूनच काही आजाराने बळी पडले होते. ते मुख्यतः उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा रुग्ण होते.8 / 10डॉक्टर म्हणतात की, आपल्या इम्यून सिस्टिमला माहीत असते की, आवश्यकता पडल्यास शरीरात नवीन अँटीबॉडीज कधी आणि कसे तयार करतात. अँटीबॉडीज असे प्रोटीन आहे, जे बी पेशी (B cells) व्हायरसला नष्ट करण्यासाठी बनवतात.9 / 10तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, व्हायरसमुळे पहिल्यांदा संसर्ग झाल्यावर शरीर सहजपणे लढायला सक्षम नसते, परंतु दुसर्यांदा संक्रमण झाल्यानंतर शरीराची इम्यून सिस्टिम त्याच्याशी सामना करण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित होते आणि पूर्वीपेक्षा चांगले अँटीबॉडी तयार करते.10 / 10कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतातील बरीच राज्ये हादरली आहेत. स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पवित्र गंगा नदीत मृतदेह वाहताना दिसतात. संक्रमित लोकांचे मृतदेह अंत्यसंस्कार करण्याऐवजी नद्यांमध्ये टाकले जात आहेत. बिहारमध्ये अशी प्रकरणे सातत्याने पाहायला मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications