corona cases in india new covid variant arcturus symptoms may causes conjunctivitis high fever
डोळे लाल, ताप, पोटदुखी... कोरोना तर नाही? नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक; 'ही' आहेत लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:38 AM1 / 13भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये या वाढीसाठी कोरोनाचे नवीन व्हेरिएंटला जबाबदार धरले जात आहेत. या व्हेरिएंटचं नाव आर्कटुरस (Arcturus) आहे. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे, ज्याला XBB.1.16 स्ट्रेन असेही म्हणतात. 2 / 13हा व्हेरिएंट आतापर्यंत सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूके, यूएसए आणि भारतासह 22 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) 22 मार्चपासून या व्हेरिएंटवर लक्ष ठेवत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत? हे जाणून घेऊया. 3 / 13कोरोना व्हायरससाठी डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड डॉ. मारिया वॅन म्हणाल्या, 'हे काही महिन्यांपासून पसरत आहे. आम्ही व्यक्ती किंवा लोकसंख्येमध्ये तीव्रतेच्या पातळीत बदल पाहिलेला नाही. तज्ञ सांगत आहेत की हा प्रकार कोरोनाच्या दोन व्हेरिएंटनी बनला आहे. 4 / 13कोरोना व्हायरससाठी डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड डॉ. मारिया वॅन म्हणाल्या, 'हे काही महिन्यांपासून पसरत आहे. आम्ही व्यक्ती किंवा लोकसंख्येमध्ये तीव्रतेच्या पातळीत बदल पाहिलेला नाही. तज्ञ सांगत आहेत की हा प्रकार कोरोनाच्या दोन व्हेरिएंटनी बनला आहे. 5 / 13ही चिंतेची बाब आहे की नवीन फॉर्म रोगप्रतिकारक शक्तीच्या संरक्षणात्मक कवचामध्ये प्रवेश करू शकतो आणि ज्या लोकांना आधीच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे किंवा ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे.6 / 13कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणं मागील स्वरूपांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. तज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन स्वरूपामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा लाल डोळे, विशेषत: 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येत आहे. 7 / 13मुलांना खूप ताप, खोकला, डोळे लाल होणे, खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे अशी तक्रार असू शकते. Arcturus ची लक्षणे इतर व्हायरससारखी असू शकतात जसे की एडेनो व्हायरस, जी भारतात उन्हाळ्याच्या हंगामात खूप सामान्य आहे.8 / 13तज्ञांच्या मते डोकेदुखी, घसा खवखवणे, बंद नाक, ताप आणि स्नायू दुखणे ही इतर लक्षणे असू शकतात. याचा रुग्णाच्या पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो आणि अतिसार होऊ शकतो. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. 9 / 13वॉरविक विद्यापीठातील व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी द इंडिपेंडंटला सांगितले की भारतातील नवीन व्हेरिएंट हा या गोष्टीचा संकेत आहे की 'आपण अजूनही धोक्याच्या बाहेर नाही' आणि 'आम्हाला त्यावर लक्ष ठेवावे लागेल.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 13कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, आरोग्य विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा आणि जीनोम सिक्वेन्सिंगचा सल्ला दिला. अनेक तज्ञ लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत. परंतु काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लस तुम्हाला 100 टक्के संरक्षण देऊ शकत नाही. बूस्टर डोस घेतला असेल तरी संसर्ग होण्याची शक्यता असते.11 / 13रूबी हॉल क्लिनिकचे कंसल्टेंट फिजिशियन डॉ. अभिजीत एम देशमुख एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, 'आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की कोरोनाविरूद्धच्या अनेक लसी कोणालाही 100 टक्के संरक्षण देत नाहीत. बूस्टर डोस घेतला तरीही नाही.' 12 / 13दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. संजय राय म्हणतात, 'यावेळी लसीचा बूस्टर डोस फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो. सुरुवातीला, जेव्हा जास्त लोकांना संसर्ग झाला नव्हता, तेव्हा हर्ड इम्युनिटी नव्हती आणि रोगाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी लस आवश्यक होती. 13 / 13'आता देशातील जवळपास सर्व लोकांना संसर्ग झाला आहे आणि त्यांच्यामध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील विकसित झाली आहे, जी कोणत्याही विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लसीपेक्षा अधिक प्रभावी आहे.' डॉ. संजय म्हणाले, 'लस कोरोनाची कोणतीही नवीन लाट थांबवू शकत नाही, ती केवळ मृत्यूची संख्या आणि रोगाची तीव्रता कमी करू शकते.' आणखी वाचा Subscribe to Notifications