शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona endemicity: कोरोना लाटांत मोजायचे सोडून द्या; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 8:53 AM

1 / 10
जगात कोरोनाने (Corona) हजेरी लावून आता 20 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून रोज कोरोनाचे नवीन नवीन व्हेरिअंट, लाटा याबाबत ऐकत आलो आहोत. पहिल्या, दुसऱ्या लाटेने घातलेला धिंगाना आपण साऱ्यांनीच पाहिला. आता भारतात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. (Expert Warn about to change approach on corona Waves. )
2 / 10
इंग्लंड सारख्या देशांमध्ये कोरोनाची तिसरी, चौथी लाट आल्याचे दावे करण्यात आले. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. कारण जगभरात 6 अब्ज लोकांना लस देण्यात आली आहे आणि कोरोनाचा उत्पातही थांबला आहे. यामुळे जगभरातील एक्सपर्ट महामारीबाबतचा आपला विचार, पद्धती बदलण्याचा सल्ला देत आहेत.
3 / 10
या तज्ज्ञानुसार आता आपल्याला कोरोनाच्या लाटांबाबत बोलणे, चर्चा करणे थांबवायला हवे. यापुढे भविष्यात येणाऱ्या नवीन प्रकारच्या धोक्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. ज्याचे स्वरुप कोरोनापेक्षा वेगळे असू शकेल. या धोक्यांना सामोरे जाण्याची पद्धतही वेगळी असेल.
4 / 10
कोरोना केस आणि मृत्यूंचा आकडा पाहून लाटांची मोजणी करण्याचे नुकसान असे झालेय की, ज्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाले तिथे सावधगिरीदेखील कमी झाली आणि कोरोना पुन्हा हात पाय पसरू लागला होता. ब्रिटन आणि अमेरिकेत कोरोनाची लाट गेल्यावर बाजार आणि शाळा उघडल्या आणि पुन्हा कोरोना फैलावला, हे ताजे उदाहरण आहे.
5 / 10
अमेरिकेत सप्टेंबर महिना खूपच घातकी दिसत आहे. लसीकरण होत असूनही रोज लाखाच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. तसेच सरासरी दोन हजार दररोज मृत्यू होत आहेत. 97 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. अमेरिकेत अद्याप 7 कोटी लोकांना लस दिली नसल्याने त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
6 / 10
ब्रिटिश व्हायरोलॉजिस्ट जेरेमी रॉसमैन यांनी ही परिस्थिती रोखण्यासाठी लाटेच्या माध्यमातून कोरोना मोजण्याची पद्धत थांबविली पाहिजे. लाट आली की नंतर ती कमी होते, पुन्हा वेगाने वाढते, हा ट्रेंड थांबवायला हवा. कमी झाली की निष्काळजीपणा वाढतो, यामुळे कोरोनाची लाट पुन्हा येऊ शकते.
7 / 10
WHO आणि GAVI नुसार पुढील काही वर्षे कोरोना जाणार नाही. कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या देशात तो डोके वर काढत राहिल. यामुळे लोकांना त्याच्या सोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. WHO च्या सीफ सायन्टिस्ट सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, आपण आता अशा फेजमध्ये वाढतोय की, याला endemicity म्हणता येईल. कमी आणि मध्यम स्थितीचे संक्रमण सुरुच राहील.
8 / 10
टॉप भारतीय व्हायरॉलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, तिसरी लाट जर आली तर ती दुसऱ्या लाटेसारखीच ताकदवर असेल हे म्हणणे ठीक नाही. तिसरी लाट आधीसारखी न होता देशातील वेगवेगळ्या भागांत सीमित राहू शकते. भविष्यात कोरोनाची लाट येणे न येणे हे लोकांच्या वागण्यावर अवलंबून असणार आहे. सणासुदीला जेवढे नियंत्रण ठेवता येईल त्यावर अवलंबून असेल.
9 / 10
21 सप्टेंबरला जगभरात 4 लाख 72 हजार रुग्ण सापडले. तर 8241 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत सध्या 97 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 13 लाख, भारतात तीन लाख, पाकिस्तानमध्ये 61 हजार.
10 / 10
भारतात गेल्या दोन आठवड्यांत दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर 2300 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनोची लाट कमी आहे, परंतू पूर्णपणे थांबलेली नाही. कारण देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक आहेत. पूर्व भारतातही लाटेने वेग घेतला आहे. यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस