शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : "महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा"; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 10:58 AM

1 / 8
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी अद्यापही गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र आहे.
2 / 8
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त घातक आहे. हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. पण शास्त्रज्ञांनी एका अभ्यासानंतर हा खुलासा केला आहे.
3 / 8
इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलेक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविड-19 ने महिलांपेक्षा पुरुषांवर जास्त हल्ला केला आहे आणि त्यांचे अधिक नुकसान केले आहे. हा व्हायरस फुफ्फुसांवर अधिक सहजपणे हल्ला करतो.
4 / 8
अमेरिकेतील हॅकेनसॅक मेरिडियन सेंटर फॉर डिस्कव्हरी अँड इनोव्हेशनशी संबंधित ज्योती नागज्योती यांनी सांगितले की, एका डेटावरून असे दिसून आले आहे की मादी उंदरांमधील ऍडिपोज टिश्यू व्हायरससाठी अधिक अनुकूल आहेत आणि त्यामुळे फुफ्फुसांवर फारसा परिणाम झालेला नाही.
5 / 8
कोरोना XBB.1.5 चा नवीन व्हेरिएंट देखील लोकांवर वेगाने हल्ला करत आहे. विशेषत: ज्यांना कोरोनापूर्वी बाधित झाले होते, त्यांच्यावर त्याचा अधिक परिणाम होत आहे. अलीकडेच एका नव्या संशोधनातही हा दावा करण्यात आला आहे.
6 / 8
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले होते की हा नवीन व्हेरिएंट जवळपास 38 देशांमध्ये सापडला आहे. अमेरिकेत 82 टक्के कोरोना प्रकरणे या नवीन व्हेरिएंटची आहेत. डेन्मार्कमध्ये 2 टक्के आणि ब्रिटनमध्ये 8 टक्के प्रकरणांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे.
7 / 8
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या व्हेरिएंटचा लोकांवर परिणाम दिसून येत आहे. डब्ल्यूएचओने यापूर्वी असेही म्हटले होते की, देशातून कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. म्हणूनच प्रत्येकाने पूर्वीप्रमाणेच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
8 / 8
देशातून कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. आताही सर्व देशांतून सातत्याने कोरोनाच्या बातम्या येत आहेत. कोरोनाचे जे काही नवीन व्हेरिएंट येत आहेत. त्याचे रुग्णही प्रत्येक देशात आढळून येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस