शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना गेला नाहीय! संपूर्ण जगाला संपवू शकतो नवा कोरोना; शास्त्रज्ञांचा इशारा

By मोरेश्वर येरम | Published: February 12, 2021 11:42 AM

1 / 8
ब्रिटनच्या केंट क्षेत्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलाय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आतापर्यंतचा सर्वात घातक विषाणू असल्याचं सांगितलं जात आहे.
2 / 8
कोरोनाचा हा नवा स्ट्रेन लवकरच संपूर्ण जगात पसरेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमधून बाहेर येण्यासाठी तब्बल एक दशकापेक्षा अधिक कालावधी लागेल, असंही सांगण्यात येत आहे.
3 / 8
यूके येथील जेनेटिक सर्व्हिलांस प्रोगामच्या प्रमुखांच्या दाव्यानुसार दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लवकरच संपूर्ण जगात पसरेल. या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणावर वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
4 / 8
'यूके'चा नवा कोरोना स्ट्रेन सध्या जगातील ५० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीच्या व्हायरसपेक्षा ७० टक्क्यांहून अधिक वेगानं पसरतो. तर ३० टक्क्यांनी अधिक घातक आहे.
5 / 8
कोविड-१९ व्हायरसवर काम करणाऱ्या डॉ. शेरोन पीकॉक यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या केंटमध्ये आढळून आलेला व्हायरस लवकरच संपूर्ण जगात पसरू शकतो.
6 / 8
शेरोन यांनी एक इशाराच दिला आहे. कोविड-१९ वरील लस जरी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर परिणाम कारक ठरत असल्याचं दिसून आलं असलं तरी या नव्या स्ट्रेनच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे हे लक्षात घ्यायला हवं असं शेरोन म्हणाले.
7 / 8
'ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन वारंवार आपलं रुप बदलतो आहे. याआधीच या व्हायरसमध्ये पाच वेळा बदल झाले आहेत. त्यामुळे या व्हायरसवरील लस प्रत्येकवेळी काम करेलच असं नाही. येत्या १० वर्षांपर्यंत या व्हायरसविरोधात आपल्याला लढत राहावं लागेल', असं शेरोन म्हणाले.
8 / 8
दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होत असतात आणि सर्वच स्ट्रेन काही जीवघेणे नाहीत, असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण लोकांनी याबाबत अधिक काळजी घेणं महत्वाचं आहे असंही त्यांनी नमदू केलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक