शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Myopia Risk: मायोपिया! जिवघेणा कोरोना आणखी एक मोठे संकट घेऊन आलाय; डॉक्टरांनी केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 9:32 PM

1 / 8
आपल्या जीवनशैलीच्या सवयींमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. कोरोनाच्या काळात अधिकांश काम हे ऑनलाईन मोडवर सुरु आहे. अनेकजण घरातून काम करत (shool, work from Home) आहेत. मोबाईल सारखा पाहत आहेत. यामुळे स्क्रीन टाईम (Screen time) खूप वाढला आहे. म्हणजेच मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीची स्क्रीन पाहण्याचा वेळ वाढला आहे. यास आरोग्य तज्ज्ञ खूप धोक्याचे मानी लागले आहेत. (Eye problems Corona)
2 / 8
द लँसेट डिजिटल हेल्थ जर्नल' मध्ये एक शोध प्रकाशित झाला आहे. यामध्ये संशोधकांनी लोकांना मोठ्या धोक्याचा इशारा दिला आहे. स्क्रीन टाईम वाढणे मुले आणि तरुणांमध्ये मायोपियाची (myopia risk) जोखिम वाढविणार आहे. वेळ हातात असतानाच यावर उपाय नाही केले गेले तर येत्या काही वर्षांत अधिकांश लोक या समस्येने त्रस्त होणार आहेत.
3 / 8
वैज्ञानिकांनी सांगितले की, मायोपिया हा विकार वय वाढल्यानंतर दिसून येत होता. आता तो कमी वयातील तरुण, लहान मुलांमध्ये दिसू लागला आहे. या एक गंभीर नेत्र विकार आहे.
4 / 8
वाढता स्क्रीन टाईम आणि मायोपियाच्या धोक्याबाबत सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, चीन आणि युकेच्या संशोधकांनी आणि डोळ्यांच्या डॉक्टरांनी अभ्यास केला आहे. यामध्ये 3 महिने ते 33 वर्षे वयोगडातील मुले आणि तरुणांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अधितर लोकांचे स्क्रीन टाईम वाढल्याचे दिसून आले.
5 / 8
या अभ्यासावरून संशोधकांनी सांगितले की, स्मार्ट डिव्हाईसच्या स्क्रीनवर खूप वेळ घालविणे मायोपियाचा धोका 30 टक्क्यांनी वाढवितो. यासोबतच कॉम्प्युटरचा अधिक वापर देखील ही जोखीम 80 टक्क्यांपर्यंत वाढविते.
6 / 8
मायोपिया म्हणजे जवळचे दिसण्यासंबंधीची समस्या आहे. यामध्ये लोकांना जवळची वस्तू स्पष्ट पणे दिसते परंतू दुसची वस्तू धुरकट दिसते. यामध्ये डोळ्याचा आकार बदलतो. सामान्यपणे डोळ्यांची सुरक्षात्मक बाहेरील आवरणावर कॉर्निया वाढल्याने ही समस्या होते. अशा परिस्थितीत डोळ्यात प्रवेश करणारा प्रकाश नीटपणे फोकस करू शकत नाही.
7 / 8
संशोधकांना जगभरातील लहान मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसत आहे. जगातील सर्व शाळा बंद असल्याने ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्ट फोन सारख्या डिव्हाईसचा वापर केला जात आहे. मोबाईलवर जास्त वेळ पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांचा आकार बदलत आहे. यामुळे त्यांना सर्वाधिक धोका मायोपियाचा आहे.
8 / 8
अँग्लिया रस्किन विद्यापीठाचे व्हिजन अँड आय रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये ऑप्थल्मोल़ॉजीचे प्राध्यापक बॉर्न म्हणतात की, 2050 पर्यंत जवळपास निम्मी जगाची लोकसंख्येवर मायोपिया होण्याचा धोका आहे. यामुळे खास सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा