शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खोटं बोलून विमानात बसणं कोरोना रुग्णाला महागात पडलं; एका तासाच्या आत गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 5:51 PM

1 / 7
अमेरिकेतील एका फ्लाईटमध्ये कोरोना व्हायसरने संक्रमित असलेल्या व्यक्तीला मृत्यूचा सामना करावा लागला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नी वैद्यकिय विभागाला दिलेल्या माहितीनुसार मागच्या एका आठवड्यापासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यांनी वास घेण्याची आणि चवीची क्षमता गमावली होती. दरम्यान त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले नव्हते. लॉस एंजेलेस शहरातून जाऊन कोरोना चाचणी करून घेणार असल्याचे सांगितले होते.
2 / 7
रिपोर्ट्सनुसार विमानाने उड्डान घेण्याआधी एक व्यक्ती खूप कापत होती. त्यानंतर या व्यक्तीला घाम येत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. विमानाने उड्डान घेतल्यानंतर या व्यक्तीची शारीरिक स्थिती आणखी गंभीर झाली होती. त्यानंतर विमानाला न्यू ओरलिएन्समध्ये इमरजेंसी लँडींग करावी लागली. या व्यक्तीची गंभीर स्थिती पाहता अनेक प्रवासी मदतीसाठी पुढे आले होते आणि वैद्यकिय टीमधील एका व्यक्तीने त्यांना सीपीआरही दिला.
3 / 7
या व्यक्तीने विमानात मास्कचा वापर केला होता. विमानात एक तास प्रवास केल्यानंतर या व्यक्तीची श्वास घेण्याची क्रिया बंद झाली. त्यानंतर केबिन क्रू मेंमर्सनी वैद्यकिय विभागाची मदत मागवली. त्यानंतर टोना एल्डापा नावाच्या व्यक्तीने संक्रमणाची पर्वा न करता या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला . पण याचा काहीही उपयोग झाला नाही. या व्यक्तीने आपले प्राण गमावले होते.
4 / 7
टोनी यांनी ट्विट करत सांगितले की, ''जो व्यक्ती कोरोनाग्रस्त होता. त्याचा सीपीआरच्या माध्यमातून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यात खूप जोखिम होती. मी या व्यक्तीच्या पत्नीशी मेडिकल हिस्ट्रीबाबत विचारणा केली असता कळाले की, ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रवास करताना लपवून ठेवलं होतं. लॉस एंजेलेसमध्ये या व्यक्तीची कोरोना टेस्ट होणार आहे.'' असं त्यांनी सांगितलं होतं.
5 / 7
या घटनेनंतर आता आरोग्य अधिकारी इतर प्रवाश्याची संपर्क करत आहेत. फ्लाईट क्रू मेंमर्सना एक ते दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वैद्यकिय आपात्कालीन स्थितीमुळे आम्हाला विमान न्यू ओरलिएन्समध्ये लँड करावे लागले. वैद्यकिय विभागाच्या टीमने या व्यक्तीला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतू याआधीच या माणसानं प्राण सोडले होते.
6 / 7
या घटनेनंतर आता आरोग्य अधिकारी इतर प्रवाश्याची संपर्क करत आहेत. फ्लाईट क्रू मेंमर्सना एक ते दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वैद्यकिय आपात्कालीन स्थितीमुळे आम्हाला विमान न्यू ओरलिएन्समध्ये लँड करावे लागले. वैद्यकिय विभागाच्या टीमने या व्यक्तीला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतू याआधीच या माणसानं प्राण सोडले होते.
7 / 7
दरम्यान आता यूनाइटेड एयरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे अनेकजण नाराज आहेत. अनेक प्रवाश्यांनी ट्विट करत , कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती विमानात येऊच कशी शकते. असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रातिनिधीक फोटो)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाHealthआरोग्य