Corona: vaccinated! You can't stop the third wave of Corona, but ...; AIIMS expert warning
Corona: लस घेतलेल्यांसाठी! तुम्ही कोरोनाची तिसरी लाट रोखू शकत नाही, पण...; एम्सच्या तज्ज्ञांचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 2:23 PM1 / 11कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) येण्यावरून खूप चर्चा होत आहे. काहींनी तर कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे म्हटले आहे. यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. देशात 50 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी देखील एम्सचे कोविड रिसर्चर आणि एक्सपर्ट यांनी लसीकरणावर मोठे व्यक्तव्य केले आहे.2 / 11कोरोना लस कोणत्याही लाटेला रोखू शकत नाही. परंतू लस कोरोनाची गंभीरता आणि त्याद्वारे होणारे मृत्यू कमी करू शकते. मात्र, कोरोना संक्रमण पसरण्य़ापासून रोखण्यास असमर्थ असेल. ज्या प्रकारे लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे, तो पाहता लसीकरणाचा किती फायदा होईल, यावर विचार करण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञाने म्हटले. 3 / 11एम्समध्ये कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर आणि कोव्हॅक्सिनचे रिसर्चर डॉ. संजय राय यांनी सांगितले की, भारतात अद्याप कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अमेरिकी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने एक माहिती जारी केली आहे. 4 / 11यानुसार जुलै 2021 मध्ये 469 रुग्णांची रिपोर्ट देण्यात आली आहे. राय यांनी सांगितले की, तीन चतुर्थांश 346 (74%) लोकांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे. तर 79 ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्या लोकांमध्येही कोरोनाचे लक्षण दिसून आले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 5 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले होते. कोणाचाही मृत्यू झाला नाही. 5 / 11यावरून असे दिसते की लस कोरोनाचा प्रसार थांबवू शकलेली नाही. अमेरिकेत दोन्ही डोस घेणारे संक्रमित झाले आहेत. सिंगापूर आणि इंग्लंडमध्येही असाच ट्रेंड दिसला आहे. लस फक्त कोरोना बळावण्यापासून रोखते आणि मृत्यूचा धोका कमी करते. 6 / 11जर अमेरिकेत, ब्रिटनमध्ये असे होत असेल तर भारतातही त्याची शक्यता आहे का? यावर सायन्सनुसार भारतातही असेच होण्याचा धोका आहे, असे उत्तर डॉक्टरांनी दिले. 7 / 11सध्या लहान मुलांच्या लसीकरणावर बोलले जात आहे. मुलांमध्ये लसीकरण किती फायद्याचे आहे, सरकार आणि अन्य संस्थांनी यावर विचार करावा.8 / 11संक्रमण झाल्यावर प्रत्येक 10 लाख मुलांमागे दोघांचा मृत्यू होत आहे. इंग्लंडमध्ये 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण बंद करण्य़ात आले आहे. 9 / 11डॉ. संजय यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केवळ मुले संक्रमित होतील हे योग्य नाहीय. आजवर जेवढे सिरो सर्व्हे आलेत त्यामध्ये 18 वर्षांहून कमी वयाच्या आणि मोठ्यांमध्ये संक्रमण दर जवळपास समानच आहे.10 / 11 मुलांवर कमी परिणाम आहे, यामुळे अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. आयसीएमआरच्या चौथ्या सिरो सर्व्हेमध्ये 60 टक्के मुलांमध्ये आणि 67 टक्के मोठ्यांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या होत्या. 11 / 11तिसऱ्या सर्व्हेमध्ये 27 टक्के मुलांमध्ये आणि 30 टक्के मोठ्यांमध्ये अँटीबॉडी मिळल्या होत्या. तर दिल्लीतील सर्व्हेमध्ये लहान मुलांमध्ये 54 टक्के आणि मोठ्यांमध्ये 51 टक्के अँटीबॉडी मिळाल्या होत्या. म्हणजेच दोन्ही वयोगटामध्ये कोरोनाचा संक्रमण दर एकसारखाच आहे परंतू मुलांमध्ये कोरोनाचा परिणाम जाणवत नाहीय. आणखी वाचा Subscribe to Notifications