Corona Vaccination: Discussions Underway Regarding Interval Between Doses Of Covishield Arora
Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर... By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 3:38 PM1 / 12सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महामारीचं संकट अद्यापही कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे केंद्र सरकारचा कल आहे. 2 / 12येत्या २१ जूनपासून केंद्र सरकार देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देणार आहे. सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी मोठ्या प्रमाणात लोकांना दिल्या जात आहेत. तर काही खासगी हॉस्पिटलकडे रशियाची स्पुतनिकही लसही उपलब्ध आहे. 3 / 12कोविड १९ पासून संरक्षण देणारी कोविशील्ड(Covishield) लसीचा दुसरा डोस पुन्हा ४ ते ८ आठवड्यांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने १३ मे रोजी कोविशील्डच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याची घोषणा केली होती. 4 / 12त्यापूर्वी कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर ६-८ आठवड्यांत दुसरा डोस देण्याची तरतूद होती. सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. एनके अरेडा म्हणाले की, अंशत: लसीकरण आणि पूर्ण लसीकरण यांच्या प्रभावीपणावर सध्या विचार केला जात आहे. 5 / 12भारतात कोविड १९ च्या विरोधात देण्यात येत असलेल्या कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करून पुन्हा ४-८ आठवडे करावे यावर विचारविनिमय सुरू आहे. कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर ४-६ आठवड्यावरून वाढवून १२-१६ आठवडे करण्याचा निर्णय वैज्ञानिकांच्या आधारे घेण्यात आला होता. याबाबत कोणताही मतभेद नाही. 6 / 12कोविड १९ आणि लसीकरण परिवर्तनवादी आहे. जर उद्या लस उत्पादकांनी सांगितले की, दोन्ही डोसमधील अंतर कमी करणं लोकांसाठी फायदेशीर ठरेल, मग ते ५ अथवा १० टक्के अधिक लाभ देणारं आहे तर समिती सर्व गुणदोषाच्या आधारे अध्ययन करून त्यावर निर्णय घेऊ शकतं असं डॉ. एनके अरोडा म्हणाले. 7 / 12किंवा दुसरीकडे सध्या सुरु असलेला निर्णय योग्य आहे असं समजलं तरीही तो कायम ठेवला जाईल असंही ते म्हणाले. आरोग्य मंत्रालयाच्या विधानानंतर अरोडा यांनी सांगितले की, दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय एडेनोवेक्टर लसीवर झालेल्या आधारे घेण्यात आला होता. 8 / 12एप्रिल महिन्याच्या अखेरीस ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवल्याने लसीचा प्रभाव ६५ ते ८८ टक्क्यांमध्ये राहतो असं म्हटलं होतं. यामुळेच ते अल्फा व्हेरिएंटपासून बचावले. त्यांच्याकडे लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवले होते असं अरोडा म्हणाले. 9 / 12आम्हीदेखील हा विचार चांगला आहे. वैज्ञानिक कारण आहे. अंतर वाढवल्याने लसीचे चांगले परिणाम दिसतात. त्यामुळे लसीच्या दोन डोसमधील अंतर १२-१६ आठवडे करण्याची घोषणा १३ मे रोजी करण्यात आली होती. याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. कॅनडा, श्रीलंका आणि काही अन्य देशांनी एस्ट्राजेनेका लसीच्या दोन डोसमध्ये १२-१६ आठवड्याचे अंतर ठेवले आहे. 10 / 12ज्यावेळी लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला त्याच्या २-३ दिवसांनी ब्रिटनमधून बातमी आली की, एस्ट्राजेनेका लसीच्या पहिल्या डोसनंतर फक्त ३३ टक्के बचाव होतो तर दोन्ही डोसनंतर ६० टक्के बचाव होतो. त्यानंतर मे महिन्याच्या विचार झाला की, भारतातही लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर ४ ते ८ आठवडे करायला हवे असा विचार झाला. 11 / 12 पीजीआयच्या चंदीगडमध्ये झालेल्या अभ्यासात अंशत: आणि पूर्ण लसीकरणात तुलना केली. यात अंशत: आणि पूर्ण लसीकरणाचा प्रभाव ७५ टक्के इतका आहे. हा अभ्यास अल्फा व्हेरिएंटबाबत केला होता जो पंजाब, उत्तर भारत आणि दिल्लीत आढळला होता. 12 / 12सीएमसी वेल्लोर अभ्यासात म्हटलं आहे की, कोविशील्डच्या अंशत: लसीकरणानं ६१ टक्के बचाव होऊ शकतो तर दोन्ही डोसमुळे ६५ टक्के बचाव होऊ शकतो. कोविड १९ च्या लसीकरणात दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय सरकारने अभ्यासाचा रिपोर्ट आणि वैज्ञानिकांच्या हवाले घेतला होता असं अरोडा म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications