शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: कोरोना लसीचा पहिला अन् दुसरा डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; WHO ने दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 2:39 PM

1 / 10
पूर्णत: लसीकरण झालेले लोकही आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यातील बहुतांश डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटना(WHO) चा दावा आहे की, लसीकरण लोकांना गंभीर आजार आणि मृत्यूच्या धोक्यापासून वाचवत आहे. WHO चे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी लसीकरण घेतलेले लोक डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित होत असल्याचं समोर येत आहे असं सांगितले.
2 / 10
डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले की, हॉस्पिटलाइजेशनचे सर्वाधिक प्रकरणं त्याठिकाणाहून येत आहेत जिथं लसीकरण कमी प्रमाणात झालं आहे. आणि डेल्टा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँन्डनुसार, लसीकरणानंतर हॉस्पिटलाइजेशन आणि मृत्यूचे ७५ टक्के प्रकरणं ६५ वयोगटातील पुढच्या लोकांना आहे.
3 / 10
त्याचसोबत लसीकरण घेतलेले लोक सुरक्षित झाले आहेत याचा अर्थ ते व्हायरस ट्रान्समिट करणार नाही असं नाही. अशा लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाही. परंतु ते सहजपणे लोकांमध्ये जाऊन व्हायरसचा प्रार्दुभाव पसरवू शकतात. त्यासाठी WHO ने लोकांना मास्क घालणं आणि सोशल डिस्टेसिंगचं पालन करण्याचा आग्रह कायम ठेवला आहे.
4 / 10
काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लसीकरण घेतलेल्या लोकांमध्ये व्हायरस कमी उत्पादित होतो. त्यामुळे तो दुसऱ्या लोकांपर्यंत पोहचू शकत नाही. पण WHO चं म्हणणं आहे की, याच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी आणखी काही शोध करण्याची गरज आहे.
5 / 10
अलीकडेच Zoe Covid Symptom Study मध्ये पाच विविध लक्षणांची ओळख पटली आहे. गेल्या काही आठवड्यात ते समोर आलं आहे. लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या लोकांमध्ये ही पाच लक्षणं आढळून येतात. लोकांद्वारे एँपवर नोंदवलेल्या लक्षणांच्या आधारे हा रिपोर्ट तयार केला आहे. त्यात कोणत्याही व्हेरिएंट अथवा डेमोग्राफिक इनफॉर्मेशनचा उल्लेख नाही
6 / 10
पहिला डोस घेतल्यानंतर लक्षणं – रिपोर्टनुसार, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कुणी व्यक्ती संक्रमित होत असेल तर त्याला डोकेदुखी, नाक वाहणे, गळा खवखवणे, शिंका येणे आणि वारंवार खोकला यासारखी लक्षणं दिसतात. ही सर्व लक्षणं कोरोनाच्या सामान्य लक्षणांसारखीच आहेत.
7 / 10
दुसरा डोस घेतल्यानंतर लक्षणं – जर कोणत्याही व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील आणि तो संक्रमित झाला असेल तर त्याला डोकेदुखी, नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे, गंध न येणे यासारखी लक्षणं जाणवतात. यात वारंवार खोकला आणि तापासारखी समस्या उद्भवणं बंद झाले आहे.
8 / 10
लस न घेतल्यास काय होईल? – Zoe Study नुसार, जर कोणत्या व्यक्तीने लस घेतली नाही आणि तो कोरोना संक्रमित झाला. तर त्याला डोकेदुखी, घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप आणि खोकला अशी लक्षणं दिसून येतात. त्याचसोबत श्वास घेण्यास त्रास, गंध न येणे हीदेखील लक्षणं आहेत.
9 / 10
कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट युरोप, यूके आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये वेगाने पसरत लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत आहे. हा व्हेरिएंट ना केवळ युवकांवर हल्ला करतो तर पूर्णत: लसीकरण झालेल्या लोकांनाही कोरोना संक्रमित करत असल्याचं समोर आलं आहे.
10 / 10
एका रिपोर्टनुसार, Oxford AstraZenca आणि Pfizer BioNTech लसीचे सिंगल डोसही डेल्टा व्हेरिएंटविरोधात खूप प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या