शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination : लसींचा परिणाम कितपत टिकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 8:21 AM

1 / 10
कोरोनाप्रतिबंधक लसी गुणकारी आहेत खऱ्या परंतु त्या कोरोनाविरोधात फार काळ रक्षण करू शकत नाहीत. ठरावीक कालावधीनंतर लसींची परिणामकारकता क्षीण होत जाते, असे संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या संख्येवरून हे लक्षात येऊ लागले आहे.
2 / 10
सीडीसीने १ मे ते २५ जुलै या कालावधीत केलेल्या आणखी एका अभ्यासात लसीकरण न झालेल्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निष्पन्न झाले.
3 / 10
या अभ्यासात लसीकरण न झालेल्या लोकांना लसीकरण झालेल्या लोकांच्या तुलनेत ३० पट धोका असतो, असे दिसून आले.
4 / 10
साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांनी अमेरिकेतील सहा राज्यांमधील ४,००० आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यात कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटच्या उद्रेकानंतर लसींचा प्रभाव कमी झाल्याचे आढळून आले.
5 / 10
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फायझर आणि मॉडर्ना लसींचे परिणामकारकतेचे प्रमाण ९१ टक्के होते ते यंदाच्या एप्रिल महिन्यात ६६ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे सीडीसीने नमूद केले आहे.
6 / 10
ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे अशा लोकांमध्ये लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली होती. मात्र, कालौघात ही प्रतिकारशक्ती कमी झाली.
7 / 10
दरम्यानच्या काळात डेल्टा हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला. डेल्टा व्हेरिएंट लसींना जुमानत नसल्याचे आढळून आले आहे.
8 / 10
फायझर-बायोएन्टेक : ८८% एवढे या लसीच्या दुसऱ्या डोसनंतरच्या परिणामकारकतेचे प्रमाण होते. ७४%पाच ते सहा महिन्यांनंतर ही परिणामकारता घसरली.
9 / 10
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका : ७७%दुसऱ्या डोसनंतर या लसीची परिणामकारकता घसरली. ६७%चार ते पाच महिन्यांनी त्यात घसरण झाली.
10 / 10
लसींचा प्रभाव कालांतराने क्षीण होत असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसींचे योगदान अमूल्य आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य